एक्स्प्लोर

Anand Mahindra : आम्ही भूकंप, दुष्काळ, दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करताना खूप पाहत आलोय, एवढंच सांगतो, कधीच भारताच्या नादी लागू नका; आनंद महिंद्रांनी सुनावलं

शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Anand Mahindra on Amid Hindenburg-Adani row : शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अहवाल समोर आल्यापासून अदानी ग्रुपवरून जागतिक माध्यमांमध्ये अनेक अंगांनी चर्चा केली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या मदतीला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अप्रत्यक्षरित्या धावून आले आहेत. सोशल मीडियात कमालीचे सक्रीय असलेले आनंद महिंद्रा नेहमीच यशस्वी गाथा, प्रेरणा देतील अशा स्टोरीज शेअर करत असतात. मात्र, आज त्यांनी अप्रत्यक्ष अदानी समूहाच्या मदतीला धावून जाताना जागतिक माध्यमांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. अर्थात, त्यांनी केलेल्या ट्वीटवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Anand Mahindra on Amid Hindenburg-Adani row : आनंद महिंद्रा ट्विटमध्ये म्हणतात.. 

आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “उद्योग क्षेत्रातील सध्याची आव्हाने जागतिक आर्थिक महाशक्ती बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालतील की नाही, यावर जागतिक मीडिया अंदाज लावत आहे. भूकंप, दुष्काळ, मंदी, युद्धे, दहशतवादी हल्ल्यांना भारत तोंड देत असताना मी दीर्घकाळ पाहत आलो आहे. मी एवढेच सांगेन, भारताच्या नादी कधीही लागू नका."

अदानी समूहाच्या बाँड आणि शेअर्समध्ये घसरण 

दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चकडून करण्यात आलेल्या खळबळजनक आरोपांमुळे समूहाच्या कंपन्यांमधील बाँड आणि शेअर्स खाली आले. हिंडेनबर्ग रिसर्चने स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हिंडेनबर्ग रिसर्चकडून अदानी ग्रुपवर संशोधन सुरु होते. हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल 1 लाख कोटींनी कमी झाले आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा शेअर्समध्ये घसरण झाल्याने दोन दिवसात बाजार भांडवल 4 लाख कोटींनी कमी झाले.

अदानी समुहाच्या प्रमुख अदानी एंटरप्रायझेससह 10 कंपन्यांमध्ये मिळून 110 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. क्रेडिट सुईस आणि  सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीला मॅक्रो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून "चहाच्या पेल्यातील वादळ" असल्याचे म्हटले आहे. शेअर्स मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे गौतम अदांनी टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीतूनही बाहेर पडले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मुकेश अंबानींनी टॉप-10 च्या यादीत प्रवेश केला आहे.

अदानी मुद्यावरून संसदेतही गदारोळ 

दरम्यान, देशातील विविध विरोधी पक्षांनी संसदेत अदानी मुद्द्यावर संसदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोध पक्षाकडून संयुक्त संसदीय समितीची चौकशी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget