मुंबई : देशात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी नाल्याचे रूप आले आहे. गुजरातमध्ये देखील रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. अशातच सध्या महिंद्रा बोलेरोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्वत: आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले.



मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर एका यूजरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. आणि या साचलेल्या पाण्यातून महिंद्राची बोलरे गाडी जाताना दिसत आहे. महिंद्रा बोलेरो गाडी त्या पाण्यातून सहज निघून जाते. हा व्हिडीओ शेअर करताना यूजरने गुजरात पोलिस, राजकोट कलेक्टर आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांना टॅग करत "महिंद्रा है तो मुमकिन है", असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.


आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया


महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी यूजरच्या पोस्टला कोट करत लिहिले आहे की, "खरचं?  एवढ्या पावसात हे दृश्य पाहून मी स्वत: हैराण आहे". हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून याला अनेकांनी शेअर केला आहे.


 






राजकोटचा आहे 'हा' व्हिडीओ


हा व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील राजकोट येथील आहे. गेल्या काही दिवसात राजकोटच्या समेत प्रदेशच्या अनेक शहरात जोरादार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांचे नुकसान देखील झाले. राजकोटमध्ये पावसामुळे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी वायूसेनेच्या हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. कालच वायूसेनेने जामनगर येथील 24 लोकांना रेस्क्यू केले. 


Israel Viral Video : चमच्याच्या सहाय्याने खोदला बोगदा, सहा पॅलेस्टिनी दहशतवादी तुरुंगातून फरार