एक्स्प्लोर

मोदी देश बरबाद करतील, अमित शाहांच्या भाषणात भाजप अनुवादकाचा घोळ

कर्नाटकातील प्रचार रॅलीदरम्यान अमित शाहांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कारण, अमित शाहांच्या एका प्रचार रॅलीदरम्यान भाजपच्या अनुवादकाने मोदी देश बरबाद करतील, असं भाषांतर करुन घोळ घातला आहे.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाहांनी प्रचार रॅलींचा धडका लावला आहे. पण या प्रचार रॅलीदरम्यान अमित शाहांना नव्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. कारण, अमित शाहांच्या एका प्रचार रॅलीदरम्यान भाजपच्या अनुवादकाने मोदी देश बरबाद करतील, असं भाषांतर करुन घोळ घातला आहे. धारवाड जिल्ह्यातील दावणगिरीमधील प्रचारसभेत बोलताना अमित शाहांनी कर्नाटकातील सिद्धरामय्यांवर निशाणा साधला. अमित शाहा म्हणाले की, “कर्नाटकातील काँग्रेसने राज्यात कोणतेही विकासाचं काम केलं नाही. त्यामुळे तुम्ही मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान करा.” पण शाहांचा कन्नड अनुवादक आणि भाजप उमेदवार प्रल्हाद जोशीने अमित शाहांच्या भाषणाचा अनुवाद करताना म्हणले की, “मोदींजवळ दलित आणि मागसवर्गीयांसाठी कोणतंही व्हिजन नाही. ते देशाला बरबाद करतील.” दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाहांची जीभ घसरली. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना, राज्यातील येडियुरप्पा सरकार अतिशय भ्रष्ट असल्याची टिप्पणी केली होती. तर यापूर्वी चित्रदुर्गमधील प्रचारसभेतही अशाच प्रकारच्या गोंधळाचा सामना अमित शाहांना करावा लागला. इथं अमित शाहा हिंदीत भाषण देत होते. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की, तुम्ही येडियुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू इच्छिता? शाहांचा हा प्रश्न उपस्थितांना नीट समजला नाही. त्यामुळे सर्वांनी हातवारे करुन नकार दर्शवला. त्यामुळे अमित शाहांची मोठी गोची झाली.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
सोनं चांदी आवाक्याबाहेर! युवकानं तयार केल्या शेणापासून राख्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक राख्यांना मागणी
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget