एक्स्प्लोर

गोव्यातील परिस्थितीवर अमित शाह दोन दिवसात निर्णय जाहीर करणार

अमित शाहांनी भाजपच्या तीन खासदार आणि तीन निरीक्षकांकडून गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. गोव्यात पर्रिकरांच्या अनुपस्थितीत काय करायचं याबाबत ते दोन दिवसात निर्णय जाहीर करतील.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारावर उपचार घेऊन येईपर्यंत गोव्यातील सरकार कसं चालवायचं, यासंदर्भात आज दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपच्या तीन खासदार आणि तीन निरीक्षकांकडून शाह यांनी गोव्यातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. ते येत्या दोन दिवसात आपला निर्णय कळवणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली. तिसऱ्यांदा अमेरिकेत उपचार घेऊन आल्यानंतरही मुख्यमंत्री पर्रिकर यांची प्रकृती सुधारली नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पर्रिकर यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. पर्रिकर यांना उपचार आणि विश्रांतीची गरज असल्याने दरम्यानच्या काळात राज्य सरकारचा कारभार कोलमडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा नेतृत्व बदल करण्याची चर्चा जोर धरु लागली होती. पर्रिकर यांना दिल्लीला हलवण्याच्या आदल्या दिवसापासून भाजपने वेगाने चक्रे हलवून तीन निरीक्षकांना गोव्यात पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठवड्यात रामलाल, बी.एल. संतोष आणि विजय पुराणिक यांनी गोव्यात दोन दिवस तळ ठोकून भाजप आमदार, घटक पक्ष आणि गोवा भाजपच्या गाभा समिती सोबत चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेतली. अमित शाहांनी आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर आणि तीन निरिक्षकांसोबत एकत्र बैठक घेतली. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत गोव्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजप आणि घटक पक्षाच्या आमदारांनी व्यक्त केलेल्या मतांवर आणि पर्यायावर सविस्तर चर्चा झाली. गोव्यातील खासदारांनी खाणी लवकर कशा सुरु करता येतील यासह विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाण्याची गरज व्यक्त केली. अमित शाहांनी सगळ्यांची मते जाणून घेतली असून येत्या दोन दिवसात आपला निर्णय कळवू, असं सांगितल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी दिली. दरम्यान, अमित शाहांनी गोव्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तिन्ही खासदारांना आज दिल्लीत बोलावताच पर्रिकर यांच्या पर्यायाची चर्चा रंगू लागली. सकाळी केंद्रीय श्रीपाद नाईक तर दुपारपासून प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. नाईक आणि तेंडुलकर यांच्यात तेंडुलकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं सूत्रांचं म्हणणे आहे. घटक पक्ष देखील तेंडुलकर यांच्यासाठी सहमत असल्याचं सांगितलं जात आहे. शाह नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतात याकडे गोमंतकीयांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget