एक्स्प्लोर

MMRDA ची थकबाकी न भरणाऱ्या ‘सोफिटेल’मध्ये अमित शाहांचं वास्तव्य

गेल्या 56 महिन्यात श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने फक्त 2 हफ्ते अदा करत 8 कोटी 76 लाख 28 हजार 100 रुपये एमएमआरडीएच्या तिजोरीत भरले. आज घडीला श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडकडून व्याजासह 31 कोटी 82 लाख 31 हजार 975 रुपये येणे बाकी आहे आणि हॉटेलसुद्धा जोरात सुरु आहे.

मुंबई : भाजपच्या महामेळाव्याला मुंबईत आलेल्या पक्षाध्यक्ष अमित शाह यांचं वास्तव्य सोफिटेल हॉटेलमध्ये वास्तव्य आहे. या हॉटेलमध्ये अमित शाह थांबल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. 31 कोटी 82 लाखांची थकबाकी एमएमआरडीएला न भरल्याचा सोफिटेलवर आरोप आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या यासंदर्भातील अर्जाला उत्तरात एमएमआरडीए प्रशासनाने ही माहिती दिली. काय आहे नेमकं प्रकरण? वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सोफिटेल हॉटेलचे अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी आधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. त्यानंतर हफ्त्या-हफ्ताने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच, एमएमआरडीएने परवानगी दिली. पण श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने शब्दाला न जागत पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे या घडीला 31 कोटी 82 लाख थकीत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. उलट श्री नमन हॉटेलने एमएमआरडीएला कोर्टात खेचत दावा दाखल केला आहे. भाजपप्रमुख अमित शाह याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असून अशा थकबाकीदार असलेल्या सोफिटेल हॉटेलची निवड भाजप पक्षाने का केली असावी? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडबाबत (सोफिटेल हॉटेल) माहिती विचारली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांना दिलेल्या कागदपत्रांनुसार, आजपर्यंत 31 कोटी 82 लाख 31 हजार 975 रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर येत आहे. बीकेसी येथील जी ब्लॉकमधील सी-57 आणि सी-58 असे 2 भूखंड श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांस 409 कोटी 20 लाखांचं मूल्य घेत लीजवर दिले. 4 वर्षात बांधकाम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडला 20 कोटी 46 लाख आणि 1 कोटी 6 लाख 50 हजार 411 असे एकूण 21 कोटी 52 लाख 50 हजार 411 इतके अतिरिक्त प्रीमियम अदा करणे आवश्यक होते. 11ऑक्टोबर 2011 रोजी एमएमआरडीए प्रशासनाने भोगवटा प्रमाणपत्र देताना जोपर्यंत अतिरिक्त प्रीमियम अदा केले जात नाही तोपर्यंत हॉटेल सुरु करण्यास मज्जाव केला होता. पण 15 फेब्रुवारी 2012 रोजी संपत कुमार जे एमएमआरडीए प्रशासनाच्या नगर व क्षेत्र नियोजन विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी 5 हफ्ताची सूट देत हॉटेल पूर्वीच्या पत्रास स्वतः बदल केला. गेल्या 56 महिन्यात श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने फक्त 2 हफ्ते अदा करत 8 कोटी 76 लाख 28 हजार 100 रुपये एमएमआरडीएच्या तिजोरीत भरले. आज घडीला श्री नमन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडकडून व्याजासह 31 कोटी 82 लाख 31 हजार 975 रुपये येणे बाकी आहे आणि हॉटेलसुद्धा जोरात सुरु आहे. पैसे भरत नसल्यास ताबडतोब भोगवटा प्रमाणपत्र रद्द करत एमएमआरडीए प्रशासनाने सोफिटेल हॉटेल सील करण्याची गरज आहे, तसेच एमएमआरडीए प्रशासनास दिलेले अंधाधुंद अधिकाराची समीक्षा मुख्यमंत्र्यांनी आता करण्याची गरज आहे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. परंतु, एमएमआरडीए अधिकारी वर्गाचे लागेबांधे असल्यामुळे कारवाईस विलंब झाला आणि नमन हॉटेलने एमएमआरडीए प्रशासनालाHe कोर्टात खेचण्याची हिंमत दाखविली. अशा थकबाकीदार हॉटेलमध्ये अमित शाह यांच्यासारख्या भाजपप्रमुखांनी राहणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?

Embed widget