नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शाह यांना 18 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शाह यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


दरम्यान, याआधीही 2 ऑगस्ट रोजी अमित शाह यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.


मात्र सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की, अमित शाह यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्सकडून माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना मागील तीन ते चार दिवसांपासून थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. ते कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ते रुग्णालयातूनच आपलं काम करत आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्वतः ट्वीट करून सांगितलं होतं. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड 19 टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी."


दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Amit Shah Beats Corona | अमित शाह यांची कोरोनावर मात


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल