रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस तब्बल 24,713 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. फ्यूचर ग्रूप रिलायन्समध्ये आल्यानंतर आता RIL देशातला सर्वांत मोठा रिटेल उद्योग ठरणार आहे. या नव्या करारामुळे देशभरातली बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल यांची 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स रिलायन्सला मिळणार आहेत. रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. ली कूपर आणि All हे कपड्यांचे ब्रँड सोडता इतर रिटेल आउटलेट RIL कडे येणार आहेत.
रिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक?; अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाल्याची चर्चा
रिलायन्स रिटेलची ताकद वाढणार
रिलायन्स रिटेलकडे सध्या 11,784 स्टोअर्स आहेत. फॅशन, फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, प्रीमिअम फॅशन यापासून ते किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कनेक्टिव्हिटीपर्यंत सगळे उद्योग रिलायन्सच्या मालकीचे आहेत. रिलायन्स रिटेलची गेल्या वर्षातली उलाढाल 1,63,000 कोटी रुपये एवढी होती. आता नव्या करारांमुळे आणि नव्या कंपन्या जोडल्या गेल्यामुळे यात मोठी वाढ होणार आहे.
RIL AGM 2020 : गुगल जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार