Jammu Kashmir : जम्मू- काश्नीरमधील बडगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित तरुणाची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे. परंतु,अशा वातावरणात कुलगाम जिल्ह्यात मुस्लिम आणि काश्मिरी पंडितांनी पुन्हा बंधुभावाचा आदर्श ठेवला आहे. स्थानिक मुस्लिमांनी एका हिंदू माणसाला त्याच्या 80 वर्षीय आईचे अंतिम संस्कार करण्यास मदत केली. कुलगामच्या वायके पोरा गावातील 80 वर्षीय पंडित महिला अनंतनागच्या मट्टन भागात आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. मात्र सोहळ्यादरम्यान प्रकृती खालावल्याने या महिलेचा मृत्यू झाला.


मृत दुलारी भट्ट ही महिला जम्मू- काश्नीरमधील बडगाम जिल्ह्यामधील वायके पोरा या गावची आहे. नुकताच तिचा मृत्यू झाला. स्थानिक मुस्लिमांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांचे मट्टान हे गवा गाठले आणि तिचा मृतदेह वायके पोला या मूळ गावी आणला. मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम नागरिकांनी तिच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.   


याबाबत  वायके पोरा या गावातील स्थानिक रहिवासी असलेले अल्ताफ अहमद यांनी सांगितले की, वायके पोरा या गावात एकटे पंडित कुटुंब त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांसोबत अनेक दशकांपासून राहत आहे. मृत व्यक्ती एक महान व्यक्ती होती. ही महिला विविध सणांच्या निमित्ताने मुस्लिम लोकांना भेटायला येत असे.  आज त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या धार्मिक संस्कारांनुसार केले.  


मृत दुलारी यांची मैत्रिण सजा बानो यांनी सांगितले की, मृत महिला तिची जवळची मैत्रीण होती. तिच्या निधनाने गावाचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझी चांगली मैत्रिण गमावल्यामुळे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. दुलारी यांचे पुत्र सुभाष भट्ट म्हणाले की, या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या परिसरातील मुस्लिमांचे मी आभार मानतो. आम्ही एकत्र राहत आहोत आणि आमच्या वडिलांची 90 च्या दशकात हत्या झाली असूनही आम्ही काश्मीरमधून पळून गेलो नाही.  तेव्हापासून आम्ही परिसरातील मुस्लिमांसोबत राहत आहोत.