एक्स्प्लोर

GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : 17 वर्षापासून ज्याची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे त्या जीएसटी विधेयकाला आज अखेरीस मूर्त स्वरूप आलं. लोकसभेमध्ये जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स)शी संबंधित चार महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाली आहे. जीएसटी संदर्भात विधेयकांना लोकसभेत हिरवा कंदील मिळाल्यामुळे आजचा दिवस ऐतिहासिक मानला जात आहे. सात तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेत या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे 'एक देश एक कर' याकडे भारताची वाटचाल सुरु झाली आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर जीएसटी कायद्यात रुपांतरित होईल. इंटिग्रेटेड किंवा एकीकृत जीएसटी (आयजीएसटी/IGST), सेंट्रल जीएसटी (सीजीएसटी/CGST), युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश जीएसटी (यूटी जीएसटी/UTGST) आणि जीएसटी कॉम्पेन्सेशन बिल ही चार विधेयक लोकसभेत पारित झाली. पाचवं विधेयक (एसजीएसटी/SGST) प्रत्येक राज्याने मंजूर करायचं आहे. 1 जुलै पासून जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. जीएसटी लागू झाल्यानं ज्या राज्यांचा तोटा होणार आहे( त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे) त्यांना पाच वर्षे भरपाई देणारं विधेयक म्हणजे जीएसटी कॉम्पेन्सेशन बिल.

काय आहे GST विधेयक? जीएसटीबद्दल सर्व काही

जीएसटी लागू करण्यासाठी मोठी घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. यासाठी कौन्सिलची निर्मिती करण्यात आली. अत्यंत गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे बारा बैठका घेण्यात आल्या. जीएसटीचे दर कुठल्या वस्तूंवर किती असणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून बाकी आहे. जीएसटी कौन्सिल त्यावर पुढे निर्णय घेईल. मागच्या ऑगस्टमधे जे जीएसटी विधेयक मंजूर झाल्याचं म्हटलं गेलं, ते जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी कराव्या लागणाऱ्या घटना दुरुस्तीला मंजुरी देणारं विधेयक होतं. याच 122 व्या घटनादुरुस्तीनं जीएसटी कौन्सिलची निर्मिती व तिला या केंद्र-राज्यांमधल्या विषयातली सर्वोच्च अधिकार संस्थेचा दर्जा दिला. चार विधेयकांच्या मंजुरीने करांबद्दल केंद्र-राज्यांमधे जी अधिकारांची कक्षा होती ती निश्चित झाली असं म्हणतात येईल.

GST विधेयक राज्यसभेत बहुमताने मंजूर, करप्रणाली सुरळीत होणार

कोणते कर रद्द होणार (केंद्रीय) GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर कोणते कर रद्द होणार (राज्यातील) GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget