एक्स्प्लोर
Advertisement
अकाऊंटंटच्या 80 जागांसाठी 8000 परीक्षार्थी, सर्वच्या सर्व नापास
एकूण 80 जागांसाठी तब्बल 8 हजार जणांनी परीक्षा दिली होती. यातील सर्वच्या सर्व म्हणजे 8 हजार परीक्षार्थी परीक्षेत नापास झाले.
पणजी : गोवा सरकारकडून अकाऊंटंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्वच्या सर्व परीक्षार्थी नापास झाले आहेत. एकूण 80 जागांसाठी तब्बल 8 हजार जणांनी परीक्षा दिली होती. यातील सर्वच्या सर्व म्हणजे 8 हजार परीक्षार्थी परीक्षेत नापास झाले.
विशेष म्हणजे, या सर्व परीक्षार्थींनी पदवीचे शिक्षण घेतलेले होते. गोवा सरकारने घेतलेल्या अकाऊंटंट परीक्षेत परीक्षार्थींना पास होण्यासाठी 100 पैकी किमान 50 गुण मिळवणे बंधनकारक होते.
लेखापाल संचालनालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, “अकऊंटंटच्या जागांवरील भरतीसाठी यंदा 7 जानेवारीला परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत एकही परीक्षार्थी पास झाला नाही.”
लेखापाल संचालनालयाने अकाऊंटंटच्या 80 जागांसाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जाहिरात देण्यात आली होती. 7 जानेवारीला परीक्षा पार पडली. 100 गुणांची परीक्षा होती. इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अकाऊंटशी संबंधित प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले होते. यासाठी पाच तासांचा अवधी देण्यात आला होता.
या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींची मुलाखत घेऊन, त्यातून अंतिम 80 जणांची अकाऊंटंट पदासाठी निवड केली जाणार होती.
“अकाऊंटंट परीक्षेचा निकाल लांबला. शिवाय, 8 हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास होणे म्हणजे गोव्यातील शिक्षणाचा दर्जा ढासळला आहे. शिवाय गोवा विद्यापीठ आणि कॉमर्स महाविद्यालयांसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे.”, अशी टीका आम आदमी पक्षाचे गोव्याचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement