Alert: कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारात (Digital Transaction) मोठी वाढ झालीय. मात्र, दुसरीकडं सायबर गुन्हेगाराचं जाळ अधिक वेगानं पसरताना दिसतंय. सायबर गुन्हेगार मानसिक दृष्टीनं कमजोर असलेल्या नागरिकांना लक्ष्य करतात. तसेच ऑफर, गिफ्ट्सचं आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक (Fraud) करतात. यातच, मुबंई सायबर पोलिसांनी यूपीआयच्या माध्यामातून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या दुकानदारांना सावधानीचा इशारा दिलाय. सायबर गुन्हेगारांनी बनावट अॅप्लिकेशन तयार करून दुकानदारांची फसवणूक करण्यास सुरुवात केलीय. विशेषत: छोट्या दुकानदारांना वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक अॅडव्हायझरी जाहीर केलीय.


मुंबई सायबर सेलचे पोलीस अधिकारी मंगेश मजगर यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी यूपीआय अॅप्लिकेशन्ससारखे डुप्लिकेट अॅप्लिकेशन तयार केले आहेत, जे अॅप स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत. या अॅप्लिकेशन्सचा वापर करून सायबर गुन्हेगार डिजिटल व्यवहारातून तुमच्या खात्यावर पैसे पाठवतात. परंतु, जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासता तेव्हा तुम्हाला पैसे मिळत नाहीत. हे अॅप प्रँक पेमेंट अॅप, मनी प्रँक प्रो, पेटीएम स्पूफ आणि स्क्रीन शॉट जनरेटरच्या नावाने खूप लोकप्रिय आहेत. सायबर गुन्हेगार तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी या प्रँक अप्लिकेशन्ससह तुमचा क्यूआर कोड स्कॅन करतात. त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवतात. काही सेकंदानं तुमच्या खात्यात पैसे गेल्याचं दिसतं. याचं स्क्रीनशॉर्ट तुम्हाला दाखवतात. परंतु, तुमच्या खात्यात पैसे येतच नाही. 


बहुतेक दुकानदार स्क्रीनशॉर्टपासून ग्राहकांवर विश्वास ठेवतात. परंतु, बराच वेळ झाल्यानंतरही पैसे आल्याचा मॅसेज न आल्यानं ते त्यांचं खातं तपासून पाहतात. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. याचपार्श्वभूमीवर मुंबई सायबर पोलिसांनी दुकानदारांना सावध केलंय. तुमच्या खात्यात पैसे न आल्यास ताबडतोब खात्यातील शिल्लक तपासा, अन्यथा तुमचीही फसवणूक होऊ शकते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA


हे देखील वाचा-