Hijab Controversy : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, भारतीय मुस्लिम अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीच्या आवाहनाकडे लक्ष देणार नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाब वादावरील निर्णयानंतर ते स्वतःला वादात अडकवणार नाहीत. ते म्हणाले की, देशातील मुस्लिम न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करतील आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांचा आदर करत राहतील.


शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालणे अपेक्षित नाही : सीएम सरमा


सीएम सरमा म्हणाले, "भारतात लोकशाही आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला असून विद्यार्थिनींनी शाळा किंवा महाविद्यालयात हिजाब परिधान करणे अपेक्षित नाही. जर तुम्ही हिजाब घातलात तर मी वेगळं काही घालेन आणि मग शाळा-कॉलेज ही धार्मिक पोशाख किंवा आचार प्रदर्शनाची जागा बनतील. मग शाळा-महाविद्यालये कशी टिकणार? सरमा पुढे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांची समानता सुनिश्चित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ड्रेसचा वापर केला जातो, परंतु अल कायदाला ते समजणार नाही. पण भारतीय मुस्लिम समजतील. मला खात्री आहे की ते न्यायव्यवस्था आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांसोबत आहेत.


अल कायदा नेत्याने मुस्कान खानचे कौतुक केले


उल्लेखनीय आहे की, अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याने हिजाब वादावर भारताला लक्ष्य करण्यासाठी एका व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, "मूर्तिपूजक हिंदू लोकशाहीच्या मृगजळातून आपली फसवणूक करणे थांबवले पाहिजे" 


काय आहे हिजाब वाद?


कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना सातत्यानं महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारनं जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार, हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आला. या आदेशानंतरही काही मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करुन आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभं करण्यात आले. त्यामुळे या मुलींनी गेटबाहेर निदर्शनं केली होती. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवं उपरणं घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या मुद्यावरुन सध्या देशात वादंग नि



संबंधित बातम्या


Karnataka Halal Meat boycott : कर्नाटकात हिजाबच्या वादानंतर आता 'हलाल' वरून गदारोळ, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...


Hijab Row : हिजाब बंदीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, कडेकोट पोलीस बंदोबस्तात विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा