Karnataka Halal Meat boycott : कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाबच्या वादामुळे (Hijab Controversy) अनेक वादांना तोंड फुटले आहे. काही मुस्लिमांनी हिजाबबाबत उच्च न्यायालयाच्या (high court) निर्णयाचा निषेध करत देशव्यापी बंदची हाक दिली. त्याचबरोबर आता हिंदुत्ववादी संघटनाही नवनवीन फर्मान काढत आहेत. ज्यामध्ये कर्नाटकात हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 'हिजाब वाद अजूनही शांत झालेला नसतानाच आता कर्नाटकात अनेक हिंदू संघटनांनी 'हलाल-मांस'वर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे. मुस्लिम दुकानातून हिंदू देवतांसाठी मांस विकत घेऊ नये, कारण तिथे हलाल-मांस विकले जाते. अशा मागणीला काही मातब्बर नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यापैकी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया


कर्नाटक हिजाब वादावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुस्लिमांनी विरोध केल्यानंतर हिंदूंनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आधी हिंदू मेळ्यांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याची चर्चा झाली, नंतर शिमोगा शहरातील प्रसिद्ध मेरीकांबा जत्रेतही मुस्लिम व्यापाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली. आता ही बंदी राज्यभर पसरत आहे. मुस्लिमांना अनेक जत्रा, उत्सव आणि मंदिरांसमोर व्यापार करण्यास बंदी घातली जात आहे. यानंतर आता कर्नाटक राज्यातही हलाल मांसावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे.
कर्नाटकमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, या मुद्द्याचा अभ्यास करून राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल, असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय. 


 






 


काय आहे संपूर्ण प्रकरण?
सीटी रवी यांनी बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 'हलाल-मांस हा खरं तर एक प्रकारचा आर्थिक-जिहाद आहे. याच मार्गाने मुस्लिमांची मक्तेदारी मांस-बाजारात आहे. हलाल-मांस म्हणजे काय? मुळात मांस विकण्यापूर्वी अल्लाहला अर्पण करण्याची मुस्लिम परंपरा आहे. हा त्यांच्यासाठी धार्मिक श्रद्धेचा मुद्दा असू शकतो. पण हिंदूंबद्दलची त्यांची श्रद्धा, त्यांच्या परंपरेचा अनादर आहे. तसेच हिंदूंसाठी हे मांस कुणाच्या तरी उरलेल्या अन्नासारखे आहे. त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. जेव्हा मुस्लिम हिंदूंकडून मांस खरेदी करण्यास नकार देतात, तेव्हा तुम्ही हिंदूंना मुस्लिमांकडून मांस खरेदी करण्यास का सांगत आहात? असा सवाल देखील भाजप नेते सीटी रवी यांनी केला आहे, हलाल मांसाला विरोध असल्याच्या प्रश्नावर भाजप नेते म्हणाले की, हा धंदा एकतर्फी नसून दोन्ही बाजूंनी चालतो. मुस्लिम नॉन-हलाल मांस खाण्यास तयार असतील तरच हिंदू हलाल मांस वापरतील असे ते म्हणाले.


हौसा-तोडाकू आणि हलाल-मांस काय आहे?
येथे दोन गोष्टी जाणून घेण्यासारख्या आहेत. कर्नाटकातील अनेक भागात उगादीच्या दुसऱ्या दिवशी (गुढी-पाडव्याला) हौसा-तोडाकू सण साजरा केला जातो. यामध्ये देवी-देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. म्हैसूर, रामनगरा, मांड्या इत्यादी जिल्ह्यांतील हिंदू समुदाय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे हलाल-मांस. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या प्रथेनुसार प्राणी एकाच झटक्यात मारण्याची परवानगी नाही. त्याऐवजी, त्यांची गळ्याची नस आधी कापली जाते. सर्व रक्त वाहू दिले जाते. मग त्याचा जीव गेल्यावर त्याला कापले जाते. या प्रक्रियेला 'हलाल' म्हणतात. तर हिंदू आणि शीख समाजात प्राणी एकाच फटक्यात कापण्याची परंपरा आहे. जेणेकरून त्यांचा त्रास कमी होईल. त्यामुळे हिंदू आणि शीख समाजातील लोकही हलाल-मांस वर्ज्य करतात.


महत्वाच्या बातम्या


Exclusive : क्या हुआ तेरा वादा? कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा राज्य सरकारला सवाल


26/11 Mumbai Terrorist Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, 14 वर्षांनंतर राज्य सरकारने उचललं पाऊल