एक्स्प्लोर

'सायकल' अखिलेश यादवांची, मुलायमसिंह यादवांना मोठा धक्का

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांच्यातील चिन्हासाठीच्या वादात अखिलेश यांनी बाजी मारली आहे. समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह 'सायकल' या दोन्ही गोष्टी अखिलेश यादव यांना मिळालं आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगनं आज आपला महत्वपूर्ण निर्णय जाहीर करुन अखिलेश यादव यांना दिलासा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं आज आपला आदेश जाहीर केला. समाजवादी पार्टीच्या तब्बल 200 आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना होता. नियमांनुसार निवडणूक आयोगाला जेव्हा कधी अशाप्रकारचा निर्णय घ्यावयाचा असतो, त्यावेळी संपूर्ण आयोगाची बैठक बोलवावी लागते, त्यानंतरच निर्णय घेतला जातो. ही बैठक साधारणत: मंगळवारी आणि शुक्रवारी होते. मात्र, आतापर्यंत अशी कुठेही माहिती मिळाली नाही की, बैठक आज (सोमवारी) आयोजित केलेली आहे. मात्र, निवडणूक आयोगानं आज संपूर्ण आयोगाची बैठक बोलावून निर्णय जाहीर केला. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार आहे. उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी 1 जानेवारीला बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. त्यानंतर आधीपासूनच समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादाला मोठं वळण मिळालं. याच अधिवेशनात मुलायसिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी या सर्व निर्णयांचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून ‘सायकल’ हे निवडणूक चिन्हही आपल्याजवळच राहायला हवं, असा दावा त्यांनी केला होता. आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ‘सायकल’सवारी करत अखिलेश यादव प्रचार कोण करणार, हे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निश्चित झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Embed widget