Akasa Air: शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा पाठिंबा असलेली आकासा एअर आता उड्डाणासाठी सज्ज आहे. गुरुवारी विमान वाहतूक नियामक DGCA ने कंपनीला एअरलाइन परवाना (एअर ऑपरेटर प्रमाणपत्र) दिला आहे. यानंतर आता कंपनी आपली विमानसेवा सुरू करू शकते. 


एअरलाइनने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, हा परवाना मिळणे आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामुळे आम्हाला आमची विमानसेवा सुरू करता येईल. तसेच व्यावसायिक कामकाज सुरू करता येईल. निवेदनानुसार, एअरलाइनने ब्रँडिंगसाठी सनराइज ऑरेंज आणि पॅशनेट पर्पल रंग निवडले आहेत. तसेच कंपनीने आपल्या क्रू युनिफॉर्मचा फर्स्ट लुक जारी करताना Akasa Air ने सांगितले की, कस्टम ट्राउझर्स आणि जॅकेट्स सादर करणारी ही पहिली भारतीय एअरलाइन आहे. आकासा एअरच्या क्रू मेंबर्ससाठी बनवलेले कपडे इको-फ्रेंडली आहेत. हा ड्रेस रिसायकल पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनवला जातो.






72 विमानांची दिली ऑर्डर


एअरलाइनने 21 जून रोजी भारतात आपल्या पहिल्या बोईंग 737 मॅक्स विमानाची डिलिव्हरी घेतली. यासोबतच Akasa Air ने घोषणा केली की एअरलाइन 72 Boeing 737 MAX जेटची ऑर्डर देत आहे. या ऑर्डरमध्ये 737-8 आणि 737-8-200 या दोन प्रकारातील विमानांचा समावेश आहे. कंपनी सर्वात आधी आपली विमानसेवा देशांतर्गत सुरू करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या