Tata power Bribery Case : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सीबीआयने टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना  अटक केली आहे. ईशान्येकडील प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. एजन्सीने अटक केलेल्या टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंह यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परंतु पीटीआयसह विविध माध्यमात आलेल्या अश्या बातम्यांचा टाटाच्या वतीने खुलासा करण्यात आला आहे. आपला कोणताही अधिकारी अश्या घटनांत सहभागी नाही हे टाटा कंपनीने स्पष्ट केले आहे. 






केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने गुरुवारी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांना आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी एस झा यांना टाटा प्रोजेक्ट्सच्या लाचखोरी प्रकरणात अटक केली. एजन्सी गुरुग्राम, दिल्ली आणि गाझियाबादमध्ये 11 ठिकाणी शोध घेत आहे. सीबीआयने स्पष्ट केले की त्यांनी ईशान्य प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक केली आहे.










एजन्सीने अटक केलेल्या टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंग यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास एजन्सीने बुधवारी गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम यासह इतर ठिकाणी शोध घेतला होता, त्या दरम्यान झा यांच्या गुरुग्राम परिसरातून 93 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती, जो सध्या इटानगरमध्ये तैनात आहे. झा कथितपणे टाटा प्रकल्पांना बेकायदेशीर पेमेंटच्या बदल्यात विविध प्रकल्पांमध्ये मदत करत होते, असे एजन्सीने म्हटले आहे.