India Hosting G20 summit In Ladakh Region: भारत यावेळी लडाखमध्ये G-20 शिखर परिषद आयोजित करण्याच्या तयारीत आहे. लडाखमध्ये G-20 शिखर परिषद घेण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी ठेवला होता. मोदींच्या या प्रस्तावावर चीन आणि पाकिस्तान चिंतीत असल्याचं म्हटलं जात आहे. मे 2020 पासून लडाखमधील सीमा विवादावरून चीन आणि भारत सतत एकमेकांसमोर आहेत. अशातच या ठिकाणी G-20 शिखर परिषदेची सरकारने तयारी सुरू केली आहे. यामुळेच मोदी सरकारच्या या निर्णयाला मास्टर स्ट्रोक म्हटले जात आहे.
याच दरम्यान भारत सरकारच्या या प्रस्तावाचा चीनने विरोध केला आहे. दोन्ही पक्षांनी एकतर्फी स्थितीत बदल करू नये, असे चीनने म्हटले आहे. याआधी जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 परिषद आयोजित करण्याच्या भारत सरकारच्या प्रस्तावाची बातमी समोर आली होती. तेव्हा चीन आणि पाकिस्तानने या प्रस्तावाला विरोध केला होता. याच दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बाली येथे पोहोचले आहेत. येथे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला आणि चीनच्या सीमेवरून त्यांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
भारताला G20 चे अध्यक्षपद कधी मिळणार?
चीन देखील G20 चा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विरोध असूनही चीन G20 बैठकीवर बहिष्कार टाकू शकत नाही. अशा परिस्थितीत चीनला लडाख किंवा जम्मू काश्मीरमध्ये परिषदेला येणे भाग पडेल. 1 डिसेंबरपासून भारताला G20 चे अध्यक्षपद मिळणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर ही पहिली मोठी परिषद असेल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Boris Johnson Resigns: अखेर बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर
Russia Ukraine War : रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर ठार, कोण होती थालिता डो?
Mohammed Zubair : पत्रकार मोहम्मद जुबेरवरून जर्मनीने भारतावर साधला निशाणा, लोकशाही मुल्यांबाबत फटकारले