एक्स्प्लोर

Aircraft Crashes : मध्य प्रदेशच्या रीवामध्ये मंदिराच्या कळसाला धडकून विमान कोसळलं; वैमानिकाचा मृत्यू

Aircraft Crashes : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर जखमी झाला.

Aircraft Crashes : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा (Rewa) जिल्ह्यात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री प्रशिक्षणार्थी विमानाचा (Aircraft) अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटचा (Pilot) मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांना उपचारांसाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान वैमानिकाचा मृत्यू झाला. उमरी गावातील कुरमियाँ टोला इथे हा अपघात झाला. हे विमान एका मंदिराच्या कळसाला धडकलं आणि अपघात झाला. 

रीवामध्ये विमानतळविकसित केलं जात आहे. इथे फाल्कन एव्हिएशन अकादमी अनेक वर्षांपासून वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. अशाच एका प्रशिक्षणाच्या दरम्यान काल रात्री उशिरा विमान मंदिराच्या कळसाला धडकलं आणि अपघात झाला. कॅप्टन विमल कुमार असं मृत वैमानिकाचं नाव असून सोनू यादव असं गंभीर जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचं नाव आहे.

कळसाला धडकून विमानाचा अपघात 

दाट धुक्यामुळे हा अपघात झाला. विमान रात्री साडेअकरा वाजता उमरी गावातील इंद्रभान सिंह यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर धडकलं आणि नंतर मंदिराच्या कळसाला आदळल्यानंतर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले. यामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रशिक्षणार्थी पायलटवर संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी उदित मिश्रा, स्टेशन प्रभारी चौराहा अनिमेश पांडे, त्याच स्टेशन प्रभारी सुनील गुप्ता आणि गुढ पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह राठोड घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विमान मंदिराच्या कळसावर न आदळता थेट खाली घरात कोसळलं असतं तर अपघात अधिक गंभीर होऊ शकला असता.

अपघातात दोघे गंभीर जखमी, वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू 

वैमानिक कॅप्टन विमल कुमार (रा. पाटणा) हे प्रशिक्षणार्थी पायलट 22 वर्षीय सोनू यादव (रा. जयपूर) याच्यासोबत ट्रेनिंग फ्लाईटवर होते. धुक्यामुळे त्यांना गावातील मंदिराचा कळस दिसू शकला नाही आणि त्याला धडकल्याने विमान कोसळलं. विमान मंदिराच्या कळसावर आदळताच मोठा स्फोट झाला आणि विमानाचा ढिगारा सर्वत्र पसरला. घरात झोपलेले लोक घाबरुन बाहेर आले. यानंतर गावकऱ्यांनी चोरहाटा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान कॅम्पट विमल कुमार सिन्हा यांचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक सोनू यादव गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget