Pakistan PM Shehbaz Sharif: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गुडघे टेकले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी (20 जून 2025) पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवादाचा सामना यासह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. सरकारी पाकिस्तान टीव्हीने 'एक्स' वर पोस्ट केलेल्या निवेदनानुसार, शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान हे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

शाहबाज शरीफ यांनी केलं डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक

उत्कृष्ट आणि सौहार्दपूर्ण चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी राष्ट्रपतींच्या धाडसी नेतृत्वाचे कौतुक केले आणि सचिव रुबियो यांच्या सक्रिय राजनैतिकतेचे कौतुक केले, ज्याने "पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्धबंदी करारावर पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली." यात पुढे शरीफ म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पाकिस्तानबद्दलचे सकारात्मक विधान दक्षिण आशियातील शाश्वत शांततेसाठी सर्वात प्रोत्साहनदायक आहे, जे केवळ पाकिस्तान आणि भारत यांच्यात अर्थपूर्ण संवाद सुरू करूनच शक्य होऊ शकते.

शाहबाज यांनी पुन्हा सिंधू नदीच्या पाण्याची केली मागणी 

सरकारी पाकिस्तान टीव्हीने म्हटले आहे की, 'या संदर्भात शाहबाज शरीफ यांनी जम्मू आणि काश्मीर, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईसह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी पुन्हा सांगितली.' किंबहुना, भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, ते फक्त पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करण्याच्या आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरच पाकिस्तानशी वाटाघाटी करेल.

इराण-इस्रायल युद्धावरही झाली चर्चा

शहबाज शरीफ आणि रुबियो यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि संपूर्ण इराण-इस्रायल संकटावरही चर्चा केली. यावेळी, पाक पंतप्रधानांनी संवाद आणि राजनैतिक मार्गाने या गंभीर संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली.

'युद्ध मी थांबवलं, माझं पाकिस्तानवर प्रेम आहे'- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा सांगितले की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवले आहे. ट्रम्प म्हणाले की मी युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडतो. पंतप्रधान मोदी एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही भारतासोबत व्यापार करार करू. त्यांनी सांगितले की मी एक मोठे युद्ध थांबवले, पण कोणीही त्याबद्दल बातमीही लिहिली नाही. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर झालेल्या संभाषणानंतर ट्रम्प यांचे हे विधान 12 तासांनी आले आहे.

हे ही वाचा