Man Urinating In Air India Flight : एअर इंडियाच्या (Air India) विमानात प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एअर इंडियातील ही 10 दिवसांतील दुसरी घटना समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. या प्रकरणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरुष प्रवाशाने लेखी माफी मागितल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मद्यधुंद प्रवाशाकडून घाणेरडे कृत्य
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.40 वाजता एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. विमानतळ सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले की पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. आणि तो केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. यानंतर दिल्लीत सीआरपीएफने त्याला पकडले. त्यानंतर दोन्ही प्रवाशांमध्ये तडजोड झाल्यानंतर पुरुष प्रवाशाला सोडण्यात आले.
10 दिवसातील दुसरी घटना
ही घटना 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर 142 मध्ये घडली. विमानाच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे तक्रार केली होती, त्यानंतर त्या पुरुष प्रवाशाला अटक करण्यात आली होती. परंतु, पुरुष प्रवाशाने महिलेची लेखी माफी मागितल्यानंतर महिलेने कोणतीही एफआयआर नोंदवली नाही आणि पुरुष प्रवाशाला सोडून देण्यात आले.
याआधी, गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 नोव्हेंबर रोजीही घडली होती घटना
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबरच्या घटनेप्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला प्रवाशाकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी कलम 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 509 अंतर्गत महिलेचा शब्द किंवा हावभावाने अपमान करणे आणि 510 सार्वजनिक ठिकाणी चुकीचे कृत्य आणि विमान नियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Air India flight: विमानात घाणेरडं कृत्य करणाऱ्या प्रवाशाला एक महिना प्रवासबंदी, आरोपीचा शोध सुरू