Male Passenger Urinated on Woman in Air India : एअर इंडियाच्या (Air India) विमान प्रवासात एका पुरुषाने स्त्रीसोबत विकृत कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. शेखर मिश्रा असे या व्यक्तीते नाव आहे. मिश्राने प्रवासात एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात हा प्रकार घडलाय. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, त्याच्यावर एअर इंडियाकडून 30 दिवसांची प्रवासबंदी करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर मिश्राचे वय साधारण 34 ते 35 च्या दरम्यान आहे. मिश्राचा शोध सुरू असून त्याला पकडण्यासाठी मिळालेल्या लोकेशनवर पोलिसांची टीम पाठवली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलाची तब्येत खराब असल्याने त्यामुळे अद्याप जबाब नोंदवलेला नाही. महिलेने ईमेलवर केलेल्या तक्रारीवरून तक्रार नोंदवली आहे. एअरलाईन्सकडून या प्रकरणाची माहिती लवकर न मिळाल्याने तपासाला उशीर झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरलाईन्सच्या क्रू मेंबरचे देखील जबाब नोंदवण्यात येणार आहे. आतापर्यंत एअरलाईन्सच्या चार जणांना पोलिसांनी नोटिस पाठवले आहे. या प्रकरणी जर आरोपी शेखर मिश्राने सहकार्य केले नाही तर LOC जारी करण्यात येणार आहे. जेणेकरून मिश्राला देश सोडून जाता येणार नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ज्येष्ठ महिलेने या संदर्भात केबिन क्रू ला माहिती दिली आहे. त्यानंतर देखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची चौकशी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर सुरू झाली. महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की , मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. क्रू मेंबरकडून देखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशीरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
FogCare: एअर इंडियाची भन्नाट सर्व्हिस, फ्लाइट कॅन्सल अथवा रिशेड्यूल करा मोफत