CBSE Board Exam 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यंदा 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येईल.


सीबीएसईने जारी केलेल्या नोटिसनुसार, यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांसाठी देशात आणि परदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. 10वीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे तर बारावीच्या परीक्षेला 36 दिवस लागतील.


दहावीची 76 विषयांसाठी तर बारावीची 115 विषयांसाठी परीक्षा 


इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली जाईल आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली जाईल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आलं आहे. 


विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल बोलायचे झाले तर, दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 12 लाख 47 हजार 364 मुले आणि 9 लाख 38 हजार 566 मुली बसतील. तर बारावीच्या परीक्षेत 9 लाख 51 हजार 332 मुले आणि 7 लाख 45 हजार 433 मुली परीक्षा देणार आहेत.


केंद्रांनी तयारी पूर्ण केली


सीबीएसई बोर्डाने नोटीसमध्ये म्हटलं आहे की, परीक्षा केंद्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार सर्व केंद्रांनी तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थी तणावाशिवाय परीक्षेला बसू शकतात आणि चांगली तयारी करू शकतात. हे लक्षात घेऊन सीबीएसईने वेळापत्रक तयार केलं आहे.


महाराष्ट्र बोर्डची बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू 


राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. राज्य मंडळाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत. 


ही बातमी वाचा: 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI