Air India New CEO : तुर्कीचे नागरिक इल्कर आयसी (Ilker Ayci) यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनण्याची ऑफर नाकारली आहे. विमान उद्योगातील सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे. टाटा समुहाने (TATA Sons) 14 फेब्रुवारी रोजी तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर आयसी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती.


इल्कर आयसीच्या उमेदवारीवर विचार करण्याचा निर्णय एअर इंडिया बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे देखील विशेष निमंत्रित होते. इल्कर आयसी आधी तुर्की एअरलाइन्सचे अध्यक्ष होते. यापूर्वी 14 फेब्रुवारी 2022 रोजी, टाटा सन्सने इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती केली होती.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या संलग्न स्वदेशी जागरण मंचाने (SJM) शुक्रवारी म्हटले होते की, सरकारने एअर इंडियाच्या ठिकाणी इल्कर आयसी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदाभार दिला जाऊ नये. स्वदेशी जागरण मंचाच्या सह-संयोजक अश्विनी महाजन यांनी म्हटले होते की, सरकार या विषयावर आधीपासूनच संवेदनशील आहे आणि हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेत आहे. एसजेएम नवनियुक्त सीईओ आणि एमडीला विरोध का करत आहे असे विचारले असता, महाजन यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha