Mahashivratri 2022 : देशात उत्साहानं महाशिवरात्री (Mahashivratri ) साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक लोक वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत असतात. पण  प्रसिद्ध डेअर ब्रँड अमूल (Amul) कंपनीनं त्यांच्या फॉलोवर्सला अनोख्या पद्धतीनं महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमूलनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 


अमूलची खास पोस्ट


एक दूधाचा ग्लास शिवलिंगावर पुष्प अपर्ण करतानाचा अॅनिमेटेड व्हिडीओ  अमूलनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओला अमूलनं दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'यंदाच्या महाशिवरात्रीला, शुद्ध अमूल दुधाने भगवान शंकराचा अभिषेख करा' अमूल कंपनीच्या पेजनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये 'महाशिवरात्रीच्या शुभेच्छा', असं लिहिलेलं दिसत आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 







अमूलच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. वेगवेगळ्या चित्रपटांबद्दलच्या तसेच घटनांबद्दलच्या खास पोस्ट अमूल कंपनी त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर करतात. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha