एक्स्प्लोर
व्हायरल सत्य : 'ग्लोबमास्टर' सज्ज, विमानं बँकांमध्ये पैसे पोहोचवणार?
मुंबई: केंद्र सरकारने नोटांचा तुटवडा दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कारण आता नोटा पोहोचवण्यासाठी सरकार आता वायूदलाची मदत घेणार आहे, असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रेसमधून छापलेल्या नोटा देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी एअरफोर्सची मदत घेतली जाईल. सर्व बँकांमध्ये पुरेसे पैसे पाठवण्यासाठी एअरफोर्सच्या 'ग्लोब मास्टर' या विमानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी 5 ग्लोबमास्टर मालवाहू विमानांची मदत घेतली जाणार आहे. RBI च्या म्हैसूर प्रिंटिंग प्रेसमधून ही विमानं त्या-त्या क्षेत्रात पैसे पाठवणार आहे, असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे.
मात्र यावर आता वायूदलाने स्पष्टीकरण दिलं आहे. 'एबीपी'च्या वायूदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सोशल मीडियावरील केवळ अफवा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने बँकांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. यावरुन सोशल मीडियावर अनेक विनोदांचे मेसेजही फिरत आहेत. त्यामुळे हा मेसेजदेखील अफवा असल्याचं वायूदलाने स्पष्ट केलं आहे.
बँकांबाहेर चार रांगा
बँकांबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे बँकाबाहेर 4 रांगा लावण्यात येणार आहेत. पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी असं या रांगांचं स्वरुप असणार आहे.
कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
कोणत्या एटीएममधून अडीच हजार निघणार?
आता एटीएममध्ये 2500 रुपये काढता येऊ शकतात. मात्र प्रत्येक एटीएममध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तर बदल झालेल्या ATM मधूनच 2500 रु. काढता येणार आहेत.
एटीएममध्ये बदल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून 2 लाख बँक कर्मचारी त्यासाठी काम आहेत.
दरम्यान, गरज नसताना बँकांमध्ये गर्दी करु नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
राज्यभरात टोलनाक्यांवर 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलवसुली केली जाणार नाही. मात्र ही मुदत वाढवण्याबाबतचा निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येईल.
संबंधित बातम्या
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले
यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ
बँकांबाहेर चार स्वतंत्र रांगा, तर मेडिकलमध्ये जुन्या नोटा चालणार
काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या खात आहेत : मोदी
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
यूपीआय काय आहे, आणि ते कसं काम करतं?
कॅशचा तुटवडा, ‘पेटीएम’, ‘पेझॅप’सारखे ई-वॉलेट कसे वापराल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सोलापूर
पुणे
Advertisement