एक्स्प्लोर
धार्मिकतेच्या नावे जवानांना दाढी वाढवता येणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : केवळ धार्मिक कारण देऊन हवाई दलातल्या कुठल्याही जवानाला किंवा अधिकाऱ्याला दाढी वाढवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. वायुदलाचे जवान मोहम्मद झुबेर आणि अन्सारी आफताब अहमद यांनी आपल्याला धार्मिक कारणावरुन दाढी वाढवण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यानंतर धार्मिकता हे कारण पुढे करता येणार नसल्याचं कोर्टाने सांगितलं आहे. झुबेर यांनी 1990 साली गृहमंत्रालयानं शीख आणि मुस्लिम समुदायाला दिलेल्या सवलतीचाही मुद्दा कोर्टापुढे मांडला होता. मात्र कोर्टानं तो अमान्य केला.
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















