एक्स्प्लोर

Indian Air Force : भारतीय हवाई दलाची नवीन वेपन सिस्टिम ब्रांच, 3400 कोटी रुपयांची होणार बचत

Weapon System Branch : भारतीय हवाई दलासाठी नवीन सर्वसमावेशक अशी नवीन वेपन सिस्टम शाखा म्हणजे शस्त्र शाखेची घोषणा करण्यात आली.

Indian Air Force Weapon System Branch : भारतीय हवाई दलाला (Indian Air Force) एक नवीन सर्वसमावेशक ऑपरेशनल ब्रांच मिळाली आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force Day) स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने शनिवारी चंदीगढ येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिके, कसरती सादर करत भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यांचं दर्शन घडलं. दरम्यान यावेळी वायू दलासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. भारतीय हवाई दलाच्या नवीन कॉम्बॅट युनिफॉर्मचं अनावरण करण्यात आलं. याशिवाय भारतीय हवाई दलासाठी नवीन सर्वसमावेशक अशी नवीन वेपन सिस्टम शाखा (New Branch for Weapon Systems) म्हणजे शस्त्र शाखेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार आता इंडियन एअर फोर्स वेपन सिस्टिम ब्रांच (Weapon System Branch) अर्थात भारतीय हवाई दलाच्या शस्त्र शाखेअंतर्गत सर्व शस्त्रांचं कामकाज पाहण्यात येईल. 

हवाई दलातील शस्त्रांसाठी नवीन शाखा

भारतीय हवाई दल प्रमुख वी.आर. चौधरी यांनी नवीन ऑपरेशनल शाखेची घोषणा केली की, केंद्र सरकारने भारतीय हवाई दलात नवी वेपन सिस्टिम ब्रांच तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या नव्या शाखेअंतर्गत भारतीय हवाई दलातील (IAF) सर्व शस्त्र प्रणाली हाताळण्यात येईल. नव्या शाखेच्या निर्मितीमुळे सुमारे 3400 कोटींची बचत होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हवाई दलासाठी अशी स्वतंत्र शस्त्र शाखा निर्मिती करण्यात येणार आहे. ही हवाई दलातील चौथी शाखा असेल.

3400 कोटी रुपयांची बचत होणार

भारतीय हवाई दल प्रमुखांनी यावेळी सांगितलं की, या शाखेमुळे भारतीय हवाई दल आणि लष्करात समन्वय साधण्यासाठीही मदत होईल. या शाखेअंतर्गत भारतीय वायू दलाच्या सर्व विभागातील सर्व प्रकारच्या शस्त्रांची देखभाल आणि कामकाज पाहण्यात येईल. यामुळे 3,400 कोटी रुपयांहून अधिक निधीची बचत होणार आहे. नवीन वेपन सिस्टिम ब्रांच हवाई दलातील विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र आणि इतर हत्यारांवर नियंत्रण ठेवेल. या शाखेमुळे हवाई दलातील प्रशिक्षणाचा खर्चही कमी होईल.

भारतीय हवाई दलाला मिळाला नवा कॉम्बॅट युनिफॉर्म

हवाई दलाला नवा गणवेश मिळाला आहे. या नवीन कॉम्बॅट युनिफॉर्मचं वैशिष्ट्य म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही हवामानात सैनिकांसाठी हा युनिफॉर्म आरामदायक असेल. भारतीय हवाई दलाचा नवीन गणवेश हा लष्कराच्या युनिफॉर्मसारखाच आहे. याची थीम 'ट्रान्सफॉर्मिंग फॉर द फ्युचर' अशी ठेवण्यात आली आहे. युनिफॉर्मचा डिजिटल पॅटर्न सर्व परिसरांसाठी अनुकूल आहे. यामुळे सैनिकांना वाळवंट, डोंगराळ भाग किंवा जंगल यांसारख्या कोणत्याही ठिकाणाहून वावरताना आराम मिळेल. हा गणवेश हवाई दलाची स्थायी ड्रेस कमिटी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) यांनी तयार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget