Ahmedabad Bomb Blast Case : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुजरात विशेष न्यायालयाने या प्रकरणात 49 जण दोषी असल्याचं म्हटलं असून 28 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी 6 जुलै 2008 साली बॉम्बस्फोट (Serial Bomb Blast) करण्यात आले. यामध्ये 56 लोकंना आपला जीव गमवावा लागला तर, 246 जण गंभीर जखमी झाले. अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी झालेल्या 21 बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये 28 आरोपी 7 राज्यांच्या तुरुंगात बंद आहेत.


अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 49 जण दोषी
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अहमदाबादमध्ये 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरातमधील विशेष न्यायालयाने निकाल देताना 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवले आहे. तर 28 जणांना निर्दोष घोषित केले आहे.
 
20 वेगवेगळ्या ठिकाणी झाले बॉम्बस्फोट
याप्रकरणी अहमदाबादमध्ये 19 आणि कलोलमध्ये एक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादीच्या न्यायालयात सादरीकरणाच्या भागामध्ये आरोपींविरुद्ध बॉम्ब बनवण्याचे पुरेसे पुरावे असल्याचे सांगण्यात आले. ज्या वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते, ती वाहने आरोपींनी नेल्याचे पुरेसे पुरावे सापडले. गुन्हेगारांविरुद्ध गुन्हेगारी कट, देशद्रोह आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचेही पुरावे आहेत. राज्यातील शांतता बिघडवणे आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे यासाठी आरोपींविरुद्ध पुरावेही सापडले. 



इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha