नवी दिल्ली : केंद्र सरकारने 22 खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये तांदूळ, गहू आणि मैद्याच्या किमती पाच वर्षांत किती आहेत याची माहिती आहे. आसामचे खासदार एम. अबरुद्दीन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तांदूळ, गहू आणि मैद्याच्या किमती वाढल्या आहेत.


तांदळाची किंमत किती?
गेल्या पाच वर्षांत तांदळाचे भाव सातत्याने वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत तांदळाच्या दरात सुमारे आठ रुपयांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये तांदळाची किंमत (प्रतिकिलो) 27.71 रुपये होती, ती 2021 मध्ये 35.65 रुपये झाली आहे. तांदळाची किंमत 2017 मध्ये (प्रतिकिलो) 29.57 रुपये, 2018 मध्ये 30.09 रुपये, 2019 मध्ये 32.09 रुपये आणि 2020 मध्ये 35.26 रुपये होती.


पाच वर्षांत गहू महागला
गेल्या पाच वर्षांत गव्हाचे भावही वाढले आहेत. 2016 मध्ये गव्हाची किंमत (प्रतिकिलो) 23.80 रुपये होती जी 2021 मध्ये वाढून 26.98 रुपये झाली. गव्हाचे दर दरवर्षी सरासरी 1 रुपयांनी वाढले आहेत. गव्हाची किंमत 2017 मध्ये 23.75 रुपये, 2018 मध्ये 24.74 रुपये, 2019 मध्ये 27.50 रुपये आणि 2020 मध्ये 28.22 रुपये होती.


मैद्याचे दरही वाढले
गहू आणि तांदूळ व्यतिरिक्त मैद्याच्या दरातही वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी मैद्याचा भाव 25.64 (प्रतिकिलो)रुपये होता जो 2021 मध्ये 30.50 रुपये झाला. मैद्याची किंमत 2017 मध्ये (प्रतिकिलो) 26.08 रुपये, 2018 मध्ये 26.80 रुपये, 2019 मध्ये 28.95 रुपये आणि 2020 मध्ये सर्वाधिक 31.17 रुपये होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha