एक्स्प्लोर

कृषीमंत्री म्हणतात चमकोगिरीसाठी शेतकरी संप, राजू शेट्टी म्हणाले कृषीमंत्र्यांची लायकी समजली

मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलं.

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मीडियात चमकण्यासाठी शेतकरी आंदोलन सुरु असल्याचं वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केलं. राधामोहन सिंह म्हणाले, “मीडियात चमकण्यासाठी काहीतरी वेगळं काम करावं लागतं. काही वेगळं केलं तरच मीडिया प्रसिद्धी देते”. शेतमालाला भाव नाही, लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास दुरावला जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. मात्र खुद्द कृषीमंत्रीच असं वक्तव्य करत असल्याने त्यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना आहे. राधामोहन सिंह यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी यापूर्वीही अशा विधानांची मालिका केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रेमप्रकरणं, कौटुंबिक कलह आणि व्यसनाधिनता जबाबदार असल्याचं अजब उत्तर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत दिलं होतं. राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी राधामोहन सिंह यांच्यावर हल्ला चढवला. अशा मंत्र्यांना लाथ मारुन मंत्रिमंडळातून हाकला. राधामोहन सिंह यांच्या वक्तव्यावरुन त्यांची लायकी समजली, असं राजू शेट्टी म्हणाले. शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत. संबंधित बातम्या  केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह खुल्या भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद   केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या गाडीवर अंडीफेक    कृषीमंत्र्यांचा रात्री 11 वाजता महिला खासदारांना मेसेज : पवार   पीकविमा मुदतवाढीचं तुमचं तुम्ही बघा, केंद्राचे हात वर  

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget