Agnipath Row : अग्निपथ योजनेवरून देशभरात गदारोळ माजलाय. केंद्र सरकारच्या या योजनेविरोधात अनेक राज्यात आंदोलनं केली जात आहेत. अनेक तरुणांनी या योजनेला विरोध दर्शवलाय. तर केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेवर पहिल्यांदाच व्यक्त झालेत.  'काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतात, पण नंतरच हेच निर्णय देशहिताचे ठरतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.' ते बंगळुरु येथे बोलत होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या बंगळुरु दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक विकासकामाचं उद्घाटन करणार आहे. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरुमध्ये  सुमारे 2280 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते कामाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनतेला संबोधितही केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे पहिल्यांदाच अग्निपथ योजेवरुन तरुणांना संदेश दिलाय. 'काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतात, पण नंतरच हेच निर्णय देशहिताचे ठरतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.' मागील आठ वर्षात केंद्र सरकारने स्पेस आणि डिफेन्स सेक्टरमध्ये तरुणांना संधी दिली आहे, असेही मोदी म्हणाले.  सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अग्निपथ योजनेच्या मुद्यावरून अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आले आहे. 


सधारणेचा मार्गचं आपल्याला नव्या लक्षाकडे घेऊन जातो. आम्ही डिफोन्स आणि स्पेस सेक्टरमध्ये अनेक तरुणांना संधी दिली आहे. ज्यामध्ये मागील अनेक दशकं सरकारचा एकाधिकार होता. ड्रोनपासून इतर दुसऱ्या टेक्नोलॉजीमध्ये तरुणांना काम करण्याची संधी देत आहोत. सरकारने तयार केलेल्या वर्ल्डक्लास टेक्नॉलिजीसाठी आम्ही तरुणांकडे आयडिया मागत आहोत, आमचं सरकार तरुणांसाठी काम करते, असे मोदी म्हणाले. 


अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण
शनिवारी झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 


आणखी महत्वाच्या बातम्या :
Agniveer Recruitment: 'अग्निपथ'वर केंद्र सरकार ठाम; आजपासून लष्करामध्ये अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू
PM Modi Agneepath : अग्निपथ योजनेवर देशभरात वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...
Anand Mahindra : अग्निपथविरोधात हिंसक आंदोलन, उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा