Agneepath Scheme Protest : भारत सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. दरम्यान या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरुन निर्दशनं करत या योजनेला विरोध दर्शवला आहे. सुरुवातील या योजनेअंतर्गत भरतीसाठीच्या वयोमर्यादेमुळे मोठा विरोध करण्यात आला. त्यानंतर सरकारने याबाबतचा निर्णय बदलत वयोमर्यादा वाढवली.


रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेच्या वयोमर्यादेत बदल केला. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्यात आली आहे. ही शिथिलता 2022 साठीच्या भरती प्रक्रियेतच लागू होईल. या आधी अग्निपथ भरती योजनेअंतर्गत भरतीसाठी किमान वय 17 वर्षे 6 महिने आणि कमाल वय 21 वर्षे होते.


दरम्यान सरकारकडून वयोमर्यादेत बदल करण्यात आल्यानंतरही देशभरातील तरुणांकडून या योजने विरोधात निदर्शनं सुरुच आहेत. या विद्यार्थ्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पाच प्रश्न जाणून घ्या.


काय आहेत अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाच प्रश्न?


1. आंदोलक तरुणांचा पहिला प्रश्न असा आहे की, चार वर्षे नोकरी म्हणजे चार वर्षांनी तरुण बेरोजगार होणार. दरम्यान त्यांना इतर नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे.


2. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे की, चार वर्षांनंतर 75 टक्के सैनिक निवृत्त होणार आहेत. यामुळे तीन चतुर्थांश लोक बेरोजगार होतील. नवीन योजनेमुळे लष्करात अधिक तरुण भरती होऊन अधिक जोमानं काम करेल, असा सरकारचा युक्तिवाद आहे.


3. अग्निपथ योजनेत निवृत्त होणाऱ्या तरुणांना पेन्शन सुविधा नाही. पण सरकारनं म्हटलं आहे की, केवळ चार वर्षांच्या सेवेत निवृत्त सैनिकाला 12 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल, याचा तरुणांना फायदा होईल.


4. चार वर्षांनी भविष्य काय असेल? सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी.


5. वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांचं काय? वयाची अट ओलांडलेलं तरुण काय करतील? त्यांचे इतक्या वर्षांचे प्रयत्न व्यर्थ ठरतील का? त्यांनी काय करावं?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI