Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. जर पवारसाहेब हो म्हणाले असते, तर ही निवडणूक रंगतदार झाली असती. पारडं त्यांच्या बाजूनं झुकलं पण असतं असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. शरद पवार हो म्हणाले असते तर अनेक राज्यातून त्यांना मोठ्य प्रमाणात मतदान झालं असतं. सध्या या निवडणुकीसाठी भाजपकडं बहुमत नाही. देशभरातील गणित केलं तर सामना बरोबरीत आहे. विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचे राऊत म्हणाले.
राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षांच्या मर्जीतले निवडले जातात
मागच्या काही काळात स्वतंत्रपणे काम करणारे फार कमी राष्ट्रपती निवडले आहेत. राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षांच्या मर्जीतले निवडले जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच विरोधी पक्ष एकमेकांशी संवाद साधत आहेत. देशाला मान्य होईल अशी व्यक्ती त्या पदावर बसावी असं सगळ्यांचं म्हणणं असल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतरही नेते चर्चा करत आहेत. तसेच भाजपचे नेतेही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत असल्याचे राऊत म्हणाले.
गांभीर्यपूर्वक ही निवडणूक लढवावी लागेल
दरम्यान, सरकारकडून कोणीही निवडणूक लढवू द्या, विरोधकांना गांभीर्यपूर्वक ही निवडणूक लढवावी लागेल असेही राऊत यावेळी म्हणाले. सध्या भाजपचे खासदार जास्त आहेत, त्याचा फायदा त्यांना होईल मात्र, देशभरातील गणित बघितलं तर सामना बरोबरीत असल्याचं राऊत म्हणाले. सत्ताधारी पक्ष नवीन राष्ट्रपती घेऊन येतील, ते त्यांच्या विचारांचे, त्यांच्या हो ला हो म्हणू शकतात असे राऊत म्हणाले. देशाला मान्य होईल अशीच व्यक्ती त्या पदावर बसावी असे राऊत म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपापला पक्ष आपापल्या आमदारांची काळजी घेईल. ती काळजी घ्यावीच लागेल अससे संजय राऊत यावेळी म्हणाले.
या निवडणुकीत शिवसेना पुढाकार घेणार नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी इतर पक्षातील नेत्यांची चर्चा सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपचे प्रमुख लोकही चर्चा करत आहेत. त्यातून काही निष्पन्न होते ते पाहुयात असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: