मणिपूर : मणिपूरच्या (Manipur) सीमावर्ती भागातील जे लोक म्यानमारला (Myanmar) पळून गेले होते अशा 212 जणांना सैन्याने पुन्हा देशात परत आणले आहे. सैन्याच्या या कामगिरीबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (Biren Singh) यांनी सुरक्षा दलाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "3 मे पासून मणिपूरमध्ये जातीय दंगली सुरु आहेत. यामुळे मणिपूरच्या सीमावर्ती भागातील मोरेह शहरामधील अनेक लोक शेजारी असलेल्या म्यानमार देशात गेली होती. त्या 212 जणांना भारतीय सैन्याने सुखरुप त्यांच्या घरी आणले आहे."


सुरक्षा दलाच्या या कामगिरीचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी कौतुक करत त्यांना धन्यवाद देखील दिलं आहे. ज्या लोकांना म्यानमारमधून पुन्हा भारतात त्यामध्ये सर्वाधिक मैतई समाजातील लोकांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी जीओसी कमांडर,  लेफ्टनंट जनरल आरपी कलिता, जीओसी 3 कॉर्प, लेफ्टनंट जनरल एचएस साही, 5 एआरचे सीओ, कर्नल राहुल जैन यांचे आभार मानले आहेत.






मोरेह शहरामध्ये सर्वाधिक हिंसाचार


मणिपूरची राजधानी इंफाळ या शहरापासून मोरेह हे शहर जवळपास 110 किमी दूर आहे. पण या शहरामध्ये सर्वाधिक हिंसाचार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या शहरामध्ये कुकी, मैतई आणि तमिळ समूहातील लोक वास्तव्यास आहेत. तसेच या शहरामध्ये इतर समूहातील लोक देखील राहतात. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं आहे की, सध्या राज्यामध्ये जो हिंसाचार सुरु त्यामुळे राज्यात शांतता प्रस्थापित करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 


3 मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु


3 मे रोजी मणिपूरमध्ये मैतई समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीच्या निषेधार्थ एका मोर्चादरम्यान या हिंसाचाराला सुरुवात झाली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 160 पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर यामध्ये अनेक लोक बेघर झाली आहेत. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक हे मैतई समाजाचे आहेत. हे लोक इंफाळमधील खोऱ्यात राहतात. तर आदिवासी नागा आणि कुकी समाजातील लोकांची एकूण संख्या ही 40 टक्के आहेत. 


हेही वाचा : 


Adhir Ranjan Chowdhury : अधीर रंजन चौधरींच्या निलंबिनानंतर विशेष अधिकार समितीची बैठक संपन्न, चौधरींना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार