नवी दिल्ली : भारतातील अमेरिकन राजदूत मेरीके कार्लसन यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी साडी परिधान केली होती. साडी नेसलेले चार फोटो पोस्ट करुन कार्लसन यांनी ट्विटराईट्सची पसंती जाणून घेतली आणि सर्वाधिक मतं मिळालेली साडी नेसली. मात्र त्यानंतर कार्लसन यांना साडी नेसण्याचा छंदच जडला.


भारतीय संस्कृतीची भुरळ जगभरातील मोठमोठ्या नेत्यांना पडली आहे. भारतात विविधता असली तरी साडी हे वस्त्र सर्वत्र परिधान केलं जातं. विविध प्रकारच्या साड्या विविध पद्धतीने नेसल्या जातात. अमेरिकन एम्बसीच्या राजदूत मेरीके कार्लसन यांनाही गेल्या वर्षी साडी नेसून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची इच्छा झाली.

कार्लसन यांच्याकडे आता 16 साड्यांचं कलेक्शन आहे. खादी आणि हँडलूम साड्या त्यांना सर्वाधिक आवडतात. यावर्षीही कार्लसन यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.

गेल्या वर्षी कांजिवरम साडी नेसून कार्लसन यांनी आपला राष्ट्रीय उत्सव साजरा केला होता. जमदानी, ड्युपिअन, कांजिवरम आणि टसर अशा चार प्रकारच्या साड्या परिधान करुन त्यांनी आपले फोटो ट्विटरवर शेअर केले होते.


आपण कोणती वेशभूषा करावी, हे त्यांनी ट्विटराईट्सना सुचवण्यास सांगितलं होतं. #SareeSearch या हॅशटॅगसह आपली मतं व्यक्त करण्याचं आवाहन मेरीके यांनी केलं होतं.