Mamata Banerjee And Subramanian Swamy : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांची बुधवारी (24 नोव्हेंबर) भेट झाली. या भेटीनंतर  सुब्रमण्यम स्वामी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटरवर मोदी सरकराचे एका रिपोर्ट कार्ड जाहिर केले आहे. या रिपोर्टकार्डमध्ये त्यांनी मोदी सरकार हे फेल आहे, असे म्हणले आहे. 


बुधवारी (24 नोव्हेंबर) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबद्दल ट्वीट करत त्यांचे कौतुक केले. त्यानी ट्विटमध्ये लिहीले,'मी आत्तापर्यंत ज्या नेत्यांसोबत काम केलंय अथवा भेटलोय त्यामध्ये ममता बॅनर्जी या  मोरारजी देसाई, जेपी, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीवी नरसिम्हा राव  या नेत्यांसारख्या आहेत, ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक नाहिये. '






त्यानंतर ट्वीट करत   सुब्रमण्यम स्वामी  यांनी मोदींचे एक रिपोर्टकार्ड जाहिर केले. यामध्ये त्यांनी लिहीले, 'त्यानंतर ट्वीट करत  सुब्रमण्यम स्वामी  यांनी मोदींचे एक रिपोर्ट कार्ड जाहिर केले. यामध्ये त्यांनी लिहीले, 'मोदी सरकार इकोनॉमी, सीमा सुरक्षा, विदेश धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्यांवर काम करण्यात फेल ठरली आहे.'
 
गेल्या वर्षी जेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय लढाई शिगेला पोहोचली होती, तेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी ममता बॅनर्जी यांना 'खऱ्या हिंदू आणि दुर्गा भक्त' असं म्हटले होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :