Congress Meeting : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सरकारला घेरण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. संसदेत सरकारला कोणत्या मुद्द्यावरुन घेरायचंय? कोणते मुद्दे लावून धरायचे? या रणनितीवर चर्चा केली जाणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांचा मुद्दा आणि महागाईसह जवळपास 15 ते 16 मुद्दे आहेत, जे काँग्रेस हिवाळी अधिवेशनात लावून धरणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीतही संसदेत यंदा महागाई, पेगासस, बेरोजगारी, चीनचा मुद्दा आणि कोरोना यांसारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैठक संध्याकाळी 4 वाजता होणार आहे.
जास्तीत जास्त मुद्दे अधिवेशनात लावून धरणार
काँग्रेसच्या बैठकीत वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, कसं जास्तीत मुद्दे संसदेत लावून धरायचे आणि त्यावर सरकारला कसं उत्तर देण्यासाठी भाग पाडायचंय, याबाबतचे निर्देश सोनिया गांधी नेत्यांना देऊ शकतात.
29 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाबाबत काँग्रेस केंद्र सरकार विरोधात जोरदार आवाज उठवताना दिसत आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे, हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळू शकते.
हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी 28 नोव्हेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 28 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सदनाचं कामकाज सुरुळीत चालवण्यासाठी चर्चा करण्यात येईल. तसेच संसदेत जास्तीत जास्त विधेयकं मंजूर करुन घेण्याकडे सरकारचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ISI Mark Product : बनावट प्रेशर कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर विकणाऱ्यांना चाप
- Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा