Karnataka Bible Row : कर्नाटकात हिजाब वादानंतर आता आणखीन एक नवा वाद सुरू झाला आहे. बंगळुरू येथील क्लेरेन्स हायस्कूलने पालकांकडून एक हमी पत्र लिहून घेतले आहे. या हमी पत्रानुसार, आता मुलांना  शाळेच्या आवारात बायबल घेऊन जाण्यास हरकत नाही. परंतु, हायस्कूलच्या या निर्णयानंतर काही उजव्या विचारसरणीच्या गटांकडून हायस्कूलचा हा निर्णय म्हणजे कर्नाटक शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. शाळा बिगर ख्रिश्चन विद्यार्थ्यांना बायबल वाचण्यास भाग पाडत असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी केला आहे.


क्लेरेन्स हायस्कूलमध्ये बिगर ख्रिश्चन विद्यार्थीही शिकतात, असा दावाही या गटाकडून करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बायबलचे वाचन करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोप मोहन गौडा  यांनी केला आहे. कर्नाटकातील हिंदू जनजागृती समितीने 'बायबल'चा समावेश केल्याप्रकरणी शाळेवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.


इयत्ता 11 च्या प्रवेश फॉर्ममध्ये पालकांकडून एक हमी पत्र भरून घेतले आहे. या पत्रात म्हटले आहे की, "तुम्ही पुष्टी करता की तुमचा मुलगा त्याच्या स्वतःच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी मॉर्निंग असेंब्ली स्क्रिप्चर क्लासेस आणि क्लबसह सर्व वर्गांना उपस्थित राहील आणि या काळात बायबलसह इतर गोष्टी बाळगण्यास हरकत नाही."  हिंदू जनजागृती समितीच्या विरोधानंतर शाळेनेही आपली बाजू स्पष्ट केली आहे. 


दरम्यान, 17 मार्च रोजी गुजरात सरकारने  इयत्ता 6 ते 12 च्या अभ्यासक्रमात भगवद्गीता समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात सरकारच्या या निर्णयाला देखील तेथील काही संघटानांकडून विरोध करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या


Hijab Row : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक


Karnataka Hijab Row : श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकताना हिजाब घालतात का? या वादात मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत : हुसेन दलवाई