Youtube Channels Bolcked by Indian Government: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार करणाऱ्या 16 यूट्यूब न्यूज चॅनेलला ब्लॉक केले आहे. या 16 यूट्यूब चॅनेलपैकी 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानमधून कार्यरत होते. भारत सरकारने IT नियम 2021 अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून हे YouTube चॅनेल ब्लॉक केले आहेत. हे यूट्यूब चॅनेल देशविरोधी विचार, जातीय द्वेष आणि भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या चॅनेलचे 68 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स होते.
5 एप्रिल रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते
5 एप्रिल रोजी देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित 22 YouTube चॅनेल ब्लॉक केले होते. आयटी नियम 2021 अंतर्गत पहिल्यांदाच 18 भारतीय YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आले होते. यादरम्यान पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहेत. यात लोकांची दिशाभूल करण्यासाठी YouTube चॅनेलने लोगो आणि टीव्ही न्यूज चॅनेलच्या बनावट लघुप्रतिमांचा वापर केला होता. याशिवाय 3 ट्विटर अकाऊंट, 1 फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे.
यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला जात होता अपप्रचार
भारत सरकारने गेल्या वेळी म्हणजेच 5 एप्रिल रोजी ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची संख्या 260 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि सुनियोजित प्रचार करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात होता.
महत्त्वाच्या बातम्या :
Navneet Rana : राणा दाम्पत्याला धक्का, दोन वेगळे गुन्हे दाखल होणं आवश्यक असल्याचं सांगत राणांची याचिका फेटाळली
Navneet Rana : राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली; जाणून घ्या कोर्टात नेमकं काय घडलं
Attack on Kirit Somaiya : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह तीन नगरसेवकांना अटक