एक्स्प्लोर

तब्बल 397 वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य; गुरु, शनी सर्वात समीप

गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणं अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणआर आहे. त्यामुळं या ग्रहांची महायुती पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे.

नवी दिल्ली : सूर्यमालेतील एक अत्यंत महत्त्वाची घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळणार आहे. ही घटना आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय समीप येण्याची. अर्थात या ग्रहांच्या युतीची.

इथं रंजक बाब अशी की, यापूर्वी 17 व्या शतकात म्हणजेच गॅलिलिओच्या जीवनकाळात हे ग्रह इतके समीप आले होते. अवकाश संशोधकांच्या मते ही बाब लक्षवेधी असली तरीही हे दोन्ही ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून जातात. पण यावेळी मात्र हे अंतर अधिक कमी असणार आहे. गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणं अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणआर आहे. त्यामुळं या ग्रहांची युती पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे.

हवामानाची परिस्थिती पूरक असल्यास सोमवारी सुर्यास्तानंतर जगभरातून हे सुरेख दृश्य पाहता येणार आहे. 21 डिसेंबर 2020 हा यंदाच्या वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याची बाबही समोर येत आहे.

खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेनट्रॉब यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची घटना कोणाही व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते.

यापूर्वी नेमकी कधी घडलेली ही घटना?

जवळपास 397 वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 1623 मध्ये हे दोन्ही ग्रह अतिशय कमी अंतरावर एकमेकांच्या समीप आले होते. पण, त्यावेळी सूर्य फार जवळ असल्यामुळं मात्र त्यांना पाहणं शक्य नव्हतं. त्याहीआधी मार्च 1226 मध्ये हे ग्रह अशाच पद्धतीनं एमेकांच्या समीप आलेले असताना तेव्हा मात्र हे दृश्य पाहता आलं होतं असं म्हटलं जातं.

कधी पाहता येणार हे दृश्य?

सोमवारी म्हणजेच सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास देशातील कोणत्याही भागातून ही ग्रहांची युती पाहण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे. जैसलमेरच्या वाळवंटी भागातून या दृश्याला पाहण्याचा अनुभव काही औरच असणार आहे. तर, इतर भागांमध्ये शहरी झगमगाटापासून दूर निरभ्र आकाशातून हे दृश्य पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra News : वकिलांसोबत कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यताBeed Crime News : भावाचा मृत्यू, 2 वर्षांपूर्वीचा राग, सततच्या धमक्या; 'दादा-वहिणी'कडून 'त्याची' दगडाने ठेचून हत्याABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 31 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 31 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Video : भरधाव लॅम्बोर्गिनीने फुटपाथवर बसलेल्या अनेक कामगारांना चिरडले, लोक धावत येताच म्हणाला, कोणं मेलं आहे का? मी टेस्ट ड्राईव्ह घेत होतो
Kolhapur Football : कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार
Raj Thackeray Speech: छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? भर सभेत राज ठाकरेंचा थेट सवाल अन्...
संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला विक्की कौशल मेल्यावर कळलं? राज ठाकरेंनी हौशा-गवशाॉ हिंदुत्त्ववाद्यांना सुनावलं
"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..." 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप
Eid Ul Fitr 2025: ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
ईदच्या सणाला महागाईचा भडका, एक लीटर दुधाचा भाव 96 रुपये, दुकानांमध्ये लागल्या रांगा
Embed widget