Gyanvapi Case News:  न्यायालयाच्या परवानगीनंतर 31 वर्षानंतर ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्यात आली आहे.   ज्ञानवापीमध्ये मोठ्या (Gyanvapi)  संख्येनं साधु-संत उपस्थित होते. ज्ञानवापीच्या तळघरात पूजेची जिल्हा कोर्टाने परवानगी दिली आहे. पुराव्यांच्या आधारे तळघरात देवी देवतांच्या पूजेला मान्यता देण्यात आली आहे. 


तब्बल 31 वर्षानंतर ज्ञानवापीच्या तळघरात दिवा लागला असून  कापूर धूप अगरबत्तीच्या सुगंधाने परिसर दरवळला आहे.  जिल्हा न्यायालयाने ज्ञानवारीच्या तळघरात पूजाअर्चा करण्यासाठी परवानगी दिली आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिद आहे की मंदिर हा वाद गेल्या अनेक दशकांपासून चालत आले आहे. धार्मिक स्थळाच्या जागेवरुन सुरु झालेला वाद कोर्टाच्या पायरीपर्यंत पोहोचला आणि तिथून तो पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाकडे येवून थांबला.


या सर्वेक्षणातून काय समोर आले?



  • 15 शिवलिंगं

  • दोन नंदी

  • हनुमानाच्या पाच मूर्ती 

  • विष्णूची तीन शिल्पं

  • दोन कृष्णाची शिल्पं

  • तीन गणपतीच्या मूर्ती

  • 32 शिलालेख 

  • शिलालेखावर देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी

  • शिलालेखावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर

  • दगडांवर अरबी  आणि पर्शियन शिलालेख 

  • तळघरात  शिल्पाचे  अवशेष 


ज्ञानवापीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अनेक असे पुरावे मिळालेत जे ही वास्तू मंदिर असल्याचं खुणवतातअसं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


मुख्य प्रवेशद्वारावर काय मिळाले?


ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा  केंद्रीय कक्ष होता. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता हे प्रवेशद्वार दगडांनी  बंद करण्यात आलंय. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा  प्रयत्न झाला, असं सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटलं गेलंय.


ज्ञानवापीचा वाद कोर्टापर्यंत कसा पोहोचला?


ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर श्रृंगारदेवीच्या मूर्तीच्या पूजेसाठी परवानगी देण्याची याचिका चार हिंदू महिलांनी याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशातप्रतिबंधित केलेल्या वजुहखान्याची जागा वगळण्यात आली होती. मशिदीच्या वजुहखान्यात शिवलिंग असल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला त्यानंतर ही जागा प्रतिबंधित करण्यात आली.


अलहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल


मुस्लिम पक्षाच्यावतीने हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचा दावा करण्यात आला. ही मशिद काशी विश्वनाथ मंदिरावर बांधल्याचा दावा हिंदू याचिकाकर्त्यांनी केला. सुरुवातीला मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या मागणीची याचिका फेटाळण्यात आली. या निर्णयाविरोधात अलहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. वादग्रस्त जागा वगळता इतर ठिकाणी  सर्वेक्षण करण्यास  परवानगी देण्यात आली. त्यानंतर  ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण सुरु झालं ज्यातून मंदिरासंदर्भातले अनेक पुरावे समोर आले.


ज्ञानवापी मशिदीतही हिंदू देवतांचे पुरावे


ज्ञानवापीच्या तळघरात देवीदेवतांच्या मूर्ती आढळल्यात. या पुराव्यांच्या आधारे तळघरात देवी देवतांच्या पूजेचा मार्गही मोकळा झाला आहे. अयोध्येतील बाबरी मशिदीपाठोपाठ वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतही हिंदू देवतांचे पुरावे आढळून आलेत त्यामुळे आता या जागेवर मंदिर होणार का? अशी चर्चा रंगू लागलीये.


हे ही वाचा :


Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीला मशिद म्हणाल तर वाद होणारच..., ती ऐतिहासिक चूक; योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य