Chinese Army Incursion: लेह-लडाखमधील (ladakh) डोंगराळ भागात पुन्हा एकदा चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचं समोर आलेय. चीनच्या पीपुल्‍स लिब्रेशन आर्मी (PLA) जवानांनी भारतीय मेंढपाळांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हाणामारी आणि बाचाबाची झाल्याचं समोर आलेय. निशस्त्र असलेल्या भारतीय मेंढपाळांनी चिनी सैनिकांना धडा शिकवला. या प्रकरणाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चिनी सैनिकांच्या भारतीय हद्दीतील घुसखोरीवरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं (Congress) व्हिडीओ पोस्ट करत टीकास्त्र सोडलेय. 


चिनी सैनिक लडाखमधील डोंगराळ भागात घुसखोरी केल्याचा आणि भारतीय मेंढपाळासोबत वाद घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भारतीय हद्दीत प्रवेश करण्याची चीनच्या सैनिकांची पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा चीनच्या सैनिकांनी आपल्या हद्दीत प्रवेश केलाय. पण यावेळी त्यांनी भारतीयांना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय मेंढपाळांनी त्यांनी दगडफेक करुन प्रत्युत्तर दिलेय. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. 







राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत निशाणा साधलाय. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, एप्रिल-मे 2020 पासून  लडाखमधील या प्रदेशात भारतीय सैनिकांनी पेट्रोलिंग बंद केलंय. इथल्या अनेक ठिकाणी यापूर्वी पेट्रोलिंग केली जात असे,त्या प्रदेशाला 'बफर झोन' म्हणून घोषित करण्यात आलंय.एवढंच नव्हे तर परमवीर चक्राने सन्मानित मेजर शैतान सिंह यांची समाधीदेखील तोडण्यात आली आहे. 2 जानेवारी रोजी एलओसी नजिकच्या  पेट्रोलिंग पॉईंट (PP) 35 आणि 36 जवळ शूट केलेल्या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक आणि स्थानिक भारतीय मेंढपाळांमधील हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे. 






मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय मेंडपाळांना चिनी सैनिकांनी मेंढ्यांना चाऱण्यासाठी घेऊन जाण्यास अडवलं. त्यानंतर चिनी सैनिक आणि भारतीय मेंढपाळामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. हत्यारबंद चिनी सैनिकांविरोधात निशस्त्र असलेले भारतीय मेंढपाळांनी समर्थपणे सामना केला. स्थानिक मेंढपाळ चीनी सैनिकांना निर्णयाला विरोध करण्यापासून मागे राहिले नाहीत. याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.