शेजारच्या गुजरातने छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्ती दिली असताना, महाराष्ट्रात हा निर्णय कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करु, अशी घोषणा केली होती. मात्र फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे झाली, मात्र सरसकट टोलमुक्ती झालेली नाही.
नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 12 टोलनाके कायमचे बंद आणि 53 टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलसूट मिळालेली नाही.
आता भाजपची सत्ता असलेल्या आपल्या शेजारील गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. त्यामुळे एरव्ही प्रत्येक गोष्टीत गुजरातच्या पावलावर पाऊल ठेवणारे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात टोलमुक्ती कधी घोषित करणार हा प्रश्न आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो.