ISRO Aditya L1 : भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेअंतर्गत अवकाशात पाठवलेल्या आदित्य L-1 (Aditya L1) अंतराळयानाने चौथा टप्पा 'अर्थ बाउंड मॅन्युव्हर' यशस्वीपणे पूर्ण केला आहे. भारतीय अंतराळ संस्था 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन' (ISRO) ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 'अर्थ बाउंड मॅन्युव्हर' म्हणजे पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे अंतराळात प्रवास करण्यासाठी गती निर्माण करणे. 


सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेले आदित्य एल-1 (Aditya L1) ही भारताची पहिली अंतराळ मोहीम आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. लॅग्रेंज पॉइंट हे असं ठिकाण आहे जिथून सूर्य ग्रहण किंवा अडथळा न होता दिसू शकतो. आदित्य एल-1 हे अंतराळयान लॅग्रेंज पॉइंट 1 वर पाठवले जात आहे. लॅग्रेंज पॉइंट 1 चे पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर आहे, तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. 


इस्रोने काय सांगितले?


इस्रोने ट्विट केले की, 'फोर्थ अर्थ बाउंड मॅन्युव्हर (EBN#4)' यशस्वी झाला आहे. इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर आणि पोर्ट ब्लेअरमधील ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून या उपग्रहाचा मागोवा घेण्यात आला. आदित्य L-1 साठी, फिजी बेटावरील वाहतूक करण्यायोग्य टर्मिनल अवकाशयानाला पोस्ट-बर्न ऑपरेशनमध्ये मदत करेल. आदित्य L-1 अंतराळयान 256 किमी x 121973 किमी अंतरावर आहे. भारतीय अंतराळ एजन्सीने म्हटले आहे की, पुढील मॅन्युअर ट्रान्स-लॅग्रेजियन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता केली जाईल. 


लॅग्रेंज पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी 110 दिवस लागतील


आदित्य L-1 अंतराळयानाचे पहिले, दुसरे आणि तिसरे र्थ बाउंड मॅन्युव्हर 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाले. इस्रोचे अंतराळयान 16 दिवस पृथ्वीभोवती फिरणार आहे. या युक्ती दरम्यान, पुढील प्रवासासाठी आवश्यक वेग प्राप्त केला जाईल. पाचव्या पृथ्वी बाउंड मॅन्युव्हरच्या यशस्वी पूर्ततेनंतर, आदित्य एल-1 त्याच्या 110 दिवसांच्या प्रवासासाठी लॅग्रेंज पॉइंटकडे रवाना होईल. 


अंतराळयानाद्वारे सूर्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असे इस्रोने म्हटले आहे. आदित्य L-1 बरोबर अनेक प्रकारची उपकरणे पाठवण्यात आली असून, त्याद्वारे सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सोलर फ्लेअर्स, कोरोनल मास इजेक्शन यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असेही इस्रोने म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Sugar : देशात साडेतीन महिने पुरेल इतका साखरेचा साठा शिल्लक, 2023-24 मध्ये चांगल्या उत्पन्नाची शक्यता