Aditya L-1 Mission : 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. चंद्रानंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो सज्ज झाले आहे. आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झालीय. आज सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी आदित्य एल-1 चं श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे. बंगळूरुतील यू. आर. राव उपग्रह केंद्रामध्ये आदित्य एल-1 हे यान तयार करण्यात आले आहे.मात्र सूर्य नेमका आहे तरी कसा? त्याची निर्मिती कधी आणि कशी झाली? सूर्यावर उष्णता कशी निर्माण होते? असे अनेक प्रश्न लहानांपासून ते पार शास्त्रज्ञांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहेत. याच प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञांकडून केला जातो. त्यासाठी भारताचं आदित्य एल 1 सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. यापूर्वी झालेल्या संशोधनात काही महत्त्वाची माहिती हाती आली आहे.
सूर्याचा जन्म 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला आहे. काही तारे मृत होताना काही भाग शिल्लक राहिला त्यातून सूर्याची निर्मिती झाली. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला मोठा गोळा आहे. सूर्याचं बाह्य आवरण हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे. सूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे. सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जास्रोत आहे. सूर्याचे स्तर हे कांद्याच्या थरांप्रमाणे आहे
सूर्याचे स्तर खालीलप्रमाणे
न्यूक्लियस
सर्वात आतले क्षेत्र आहे. तो ताऱ्याचा एक पंचमांश भाग व्यापतो. याच ठिकाणी
सूर्यावर प्रचंड अणुस्फोट झाले
तेजस्वी झोन
हेलियम आणि आयनीकृत हायड्रोजनने बनलेले स्तर आहे. हे क्षेत्र सूर्याची
अंतर्गत उर्जा सहजपणे बाहेरच्या दिशेने पसरू देते. ज्यामुळे या भागातील
तापमान मोठ्या प्रमाणात कमी होते
संवहन क्षेत्र
हाच प्रदेश सूर्यापासून दिसणारा प्रकाश सोडतो
सूर्य मुकुट
हा बाह्य सौर वातावरणातील सर्वात पातळ थर आहेत. सर्वात आतील स्तरांच्या तुलनेत लक्षणीय उबदार आहेत. हे सूर्याच्या स्वरूपाचे एक न सुटलेले रहस्य आहे. पदार्थाची कमी घनता आणि एक तीव्र चुंबकीय क्षेत्र आहे. हा स्तर अनेक क्ष-किरणांचा स्रोत आहे.
जेव्हा सूर्याबद्दल चर्चा होते तेव्हा आणखी एक मुद्दा चर्चीला जातो. तो म्हणजे सूर्य ग्रहण पंचागात तर सूर्य ग्रहणासंदर्भातअनेक गोष्टी नमूद आहेत
सूर्य ग्रहण म्हणजे नेमकं काय?
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येऊन चंद्राने पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा दर्शनी भाग झाकला की सूर्यग्रहण होते. अशी स्थिती अमावास्येला होत असल्याने सूर्यग्रहण फक्त अमावास्येला होऊ शकते. अर्थात प्रत्येक अमावास्येला ग्रहण नसते.
सूर्य पृथ्वीला गिळणार का?
सूर्य पृथ्वीला गिळणार का? असाही प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. त्यावरच चर्चा आणि काही अफवाही पसरल्या पण शास्त्रज्ञांच्या मते सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. या कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. या प्रोसेसमध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनचं रूपांतर होतच नाही. त्याचं रूपांतर ऊर्जेत होतं, हीच ऊर्जा अवकाशात पसरते. संशोधकांच्या मते सूर्याची ही प्रक्रिया आणखी 4.5 कोटी वर्षे चालेल. त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल.त्यामुळे कोअर तापमान वाढेल यामुळे सूर्याचा आकार आहे त्यापेक्षा 100 पटीने वाढेल असं झालं तर सूर्य आधी बुध आणि शुक्र या ग्रहांचा विनाश करेल त्यानंतर पृथ्वीचा विनाश करेल.
हे आतापर्यंतचं संशोधन आहे पण याच्यापुढे जावून शास्त्रज्ञांनी सूर्याचा अभ्यास करायचं ठरवलंयत्यासाठी आदित्य एल 1 सुद्धा सज्ज झालंय. आता प्रतिक्षा आहे ती मिशन यशस्वी होण्याची आहे.
हे ही वाचा :