Adar Poonawalla : लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यन यांनी 90 तास काम करण्याचं आवाहन केलं होतं. कॉर्पोरेट प्रमुखांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. सोशल मीडियावर '90 तास' हा ट्रेंड सुरु असतानाच यात उद्योगपती अदर पुनावाल्यांनी उडी घेतलीय. त्यांनी एसएन सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्याला विरोध केला आणि आनंद महिंद्रा यांचे समर्थन केलं. रविवारी माझ्या बायकोला माझ्याकडे पाहायला आवडतं असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कामाच्या तासांपेक्षा कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे असंही ते म्हणाले.
अदर पुनावाला म्हणाले की, "होय आनंद महिंद्रा, अगदी माझी पत्नी एन पूनावालांना देखील मी शानदार वाटतो. त्यामुळे तिला रविवारी माझ्याकडे पाहणे आवडते. कामाच्या तासापेक्षा कामाची गुणवत्ता नेहमीच महत्त्वाचे असते."
कर्मचाऱ्यांनी 90 तास काम करण्याचं आवाहन
भारतात कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवं असा सल्ला लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस.एन.सुब्रमण्यम यांनी दिला. खरं तर कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर जायला हवं असं एल अँड टीच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना सुब्रमण्यम यांनी सांगितलं. रविवारी घरी बसून काय करता? असा सवालही त्यांनी विचारलाय.
एस.एन.सुब्रमण्यम म्हणाले की, "तुम्हा कर्मचाऱ्यांना रविवारीही कामावर बोलवू शकत नाही याचा मला खेद वाटतो. म्हाला रविवारीही बोलवू शकलो तर मला खूप आनंद होईल,कारण मीही रविवारी काम करतो. र्मचारी रविवारी घरी बसून काय करतात? किती वेळ बायकोकडे बघत बसणार? ती तरी तुमच्याकडं किती वेळ बघत बसेल? ला रविवारीही कामावर जाऊ.
आनंद महिंद्रांचे प्रत्युत्तर
एस.एन.सुब्रमण्यम यांच्या या आवाहनानंतर त्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली. माझी बायको खूप सुंदर असल्याने मा तिच्याकडे बघत बसायला आवडते असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, "मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते, ही चर्चा चुकीच्या दिशेला जात आहे. कामाच्या दर्जावर आपण अधिक चर्चा करायला हवी. त्यामुळे 40 की 48 किंवा 70 की 90 तास केले, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही 10 तास चांगले काम करू शकत असाल तर त्यातूनही जग बदलता येते."
बॉलीवूड स्टार दिपीका पदुकोननेही या विधानाचा विरोध केला. ती म्हणाले की, "एवढ्या मोठ्या पदावर बसलेले लोक असं बोलतात हे धक्कादायक आहे. मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे."
याआधी इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास कामाचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता एल अँड टी चे चेअरमन एस.एन.सुब्रमण्यम यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, एकीकडे सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर टीका होत असताना दुसरीकडे मात्र टेस्लाचे इलॉन मस्क यांनी देखील काही दिवसांपूर्वी 80 ते 100 तास काम केल्यानं यश मिळण्याची शक्यता वाढते असं म्हटलं होतं. बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शंतनू देशपांडे आणि झेप्टोचे सीईओ आदित पलिचा यांनी देखील अधिक तास कामासाठी वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता.
ही बातमी वाचा: