एक्स्प्लोर

यूपीत कत्तलखान्यांवर कारवाई, मांस विक्रेते बेमुदत संपावर

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कत्तलखान्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मटण विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. अवैधरित्या चालत असलेल्या कत्तलखान्यांवर सुरु करण्यात आल्यामुळे हॉटेल मालक, मांस विक्रेते आक्रमक झाले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसाय मोडकळीस आला आहे. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झालेले आहेत. त्यामुळे मटण, चिकन आणि मासे विक्रेत्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे, अशा कत्तलखान्यांवर कारवाई होणार नाही, असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईमुळे सरकारचं 11 हजार कोटींचं नुकसान उत्तर प्रदेशात केवळ 40 कत्तलखाने वैध आहेत, तर 316 कत्तलखाने अवैध आहेत. ज्या कत्तलखाने चालकांकडे संबंधित विभागाच्या सर्व परवानग्या नाहीत, ते अवैध ठरवण्यात आले आहेत. कत्तलखाने बंद झाल्याने सरकारलाही 11 हजार 350 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कारवाईपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने कत्तलखान्यांवर बंदी आणली होती. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्याची घोषणा केली होती. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून ही कारवाई सुरु होईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारसभेत म्हटलं होतं. ''कारवाई योग्य, पण परवाना काढण्यासाठी वेळ द्या'' मात्र भाजपचं सरकार येताच पोलिसांनी 15 मार्चपासूनच अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु केली. योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी शपथ घेतल्यानंतर या कारवाईला वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्येही 20 मार्चला अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक कत्तलखाना मालकांनी परवाना नसल्याने स्वतःहून कत्तलखाने बंद केले आहेत. कत्तलखान्यांवर सुरु असलेल्या कारवाईचं काही जणांकडून समर्थन केलं जात आहे, तर काही जणांकडून विरोधही केला जात आहे. कारवाई करावी, पण आम्हाला काही वेळ द्यावा, कारण परवाना काढण्याची प्रक्रिया जाचक आहे, असं मांस विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget