Ahmedabad Accident:   गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील इस्कॉन पुलावर (ISKON Bridge) झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये (Accident) 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी जमू लागली होती. तेव्हाच मागून एक गाडीने येऊन लोकांना चिरडलं. 


या अपघातामध्ये आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. डंपर आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर अपघाताची तपासणी करण्यासाठी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा देखील या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


चालक देखील गंभीर जखमी 


गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सरखेज-गांधीनगर या महामर्गावर इस्कॉन पुलावर हा अपघात झाला आहे. जखमींना तात्काळ तेथील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ज्या गाडीने या गर्दीला चिरडले त्या गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. त्या चालकाला देखील रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी करण्यास देखील सुरुवात झाली आहे. तसेच ज्या मुलांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यांचे नातेवाईक देखील मृतांची ओळख पटवण्यासाठी पोहोचले असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  ज्यावेळी हा अपघात झाल्या त्यावेळी काही विद्यार्थी या पुलावर फिरत होते. त्यामुळे या अपघातामध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. या विद्यार्थ्यांकडून पोलीस डंपर आणि गाडीच्या अपघाताची माहिती घेत होते. तेवढ्यातच एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ही सगळे लोक त्या गाडीखाली चिरडली गेली. जवळपास 200 मीटरपर्यंत ही गाडी या लोकांना चिरडत गेली. 






या भीषण अपघातानंतर इस्कॉन पुलावर बचावरकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी इस्कॉन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे आता या चालकावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासन अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा : 


Khalapur Irshalgad Landslide : माळीण-तळीयेची पुनरावृत्ती, खालापूरमध्ये गावावर दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली