एक्स्प्लोर

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बसला उडवलं, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बसला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. स्कूल बसमध्ये एकूण 20 मुलं होते, ज्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी आहेत.

लखनौ : उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल बसला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. स्कूल बसमध्ये एकूण 20 मुलं होते, ज्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी आहेत. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल बसला उडवलं आणि यात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कूल बसचालक इयरफोन लावून गाडी चालवत होता, ज्यामुळे त्याला ट्रेनचा आवाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. शिवाय चालकाला एका व्यक्तीने थांबण्याचाही इशारा दिला, पण तो थांबला नाही. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात शोककळा पसरली आहे. पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. सर्वांना गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. शिवाय जखमींना मोफत उपचार आणि योग्य ती मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Dharmendra Pradhan Resign: मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा? सरसंघचालकांच्या 'त्या' भूमिकेने सरकार बॅकफूटवर; चर्चांना उधाण
Amit Shah: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget