एक्स्प्लोर

एबीपी सर्व्हे : सपात फूट पडल्यास यूपीमध्ये भाजपला फायदा

नवी दिल्ली : यूपीमधील यादव कुटुंबात सुरु असलेल्या दंगलीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसनं केलेल्या सर्व्हेमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादवांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मात्र सपामध्ये दोन गट पडले तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेच्या जवळ जाऊ शकतं. विशेष म्हणजे समाजवादी पक्षात एकी राहिली तर सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्यात त्यांना कुठलाही अडथळा येणार नाही. भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच फुटीच्या उंबरठ्यावर असलेला समाजवादी पक्ष एकसंध रहावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव यांच्यामध्ये तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं त्याची माहिती अधिकृतरित्या समोर आली नाही. मात्र मुलायम पक्षाच्या संस्थापक अध्यक्षपदावर असतील तर अखिलेश राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक म्हणजे 28 टक्के पसंती मिळाली आहे. मायावती यांना 21 टक्के जनतेने पसंती दिली आहे. भाजपच्या आदित्यनाथ यांना अवघी 4 टक्के, तर मुलायमसिंह यांना 3 टक्के जनतेने पाठिंबा दिला आहे. कोणत्या भागात कोणाचा दबदबा? एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात पूर्व यूपीमध्ये सपाला 35 टक्के, तर भाजपला 30 टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. तर बसपला 18 टक्के जनतेचा पाठिंबा आहे. पश्चिम भागात मात्र भाजपला घसघशीत म्हणजे तब्बल 37 टक्के जनतेची पसंती मिळाली आहे. सपाला 16 तर बसपला 12 टक्के पसंती आहे. सपामधील कलहाला जबाबदार कोण? सपामधील कलहाला 6 टक्के नागरिकांनी अखिलेश यादव यांना जबाबदार ठरवलं आहे, तर एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसच्या सर्वेक्षणात 25 टक्के जनतेने शिवपाल यांना जबाबदार मानलं आहे. मायावती सरकारच्या तुलनेत अखिलेश सरकार चांगलं असल्याचं 41 टक्के जनतेला वाटतं. मुस्लिम मतदार सपाच्या बाजुने आहेत, तर दलित मतदार बसपच्या पाठीशी आहेत. सवर्ण आणि ओबीसी भाजपच्या सोबत असून ओबीसींपैकी यादव मात्र सपाच्या बाजुने आहेत. कोणाला किती जागा? सपाला 141 ते 151 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आणि युतीला 129-139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपला 93-103 तर काँग्रेसला 13-19 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी न्यूज-लोकनीति-सीएसडीएसच्या सर्वेक्षणात बांधण्यात आला आहे. एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसने हे सर्वेक्षण 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत केलं. त्यावेळी मुलायम आणि अखिलेश यांच्यातील वाद इतके टोकाला गेले नव्हते. एबीपी न्यूज- लोकनीति- सीएसडीएसने 65 विधानसभा क्षेत्रातील 5 हजार 932 नागरिकांशी संवाद साधला.

महत्त्वाच्या बातम्या

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Akhilesh Yadav: प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव
प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?:अखिलेश यादव

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget